जीवनमृत्यू कुणाच्या हातात नाही. पण काही वेळा चमत्कारिक घटना घडतात. ज्यामुळे लोक मरणाच्या दारातून परत येतात. असाच एक चमत्कारिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
ज्यात एका व्यक्तीने मृत्यूलाही चकवा दिला आहे. मृत्यू समोरून वेगाने आला आणि या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवला आहे.
देव तारी त्याला कोण मारी… ही म्हण आपल्याला माहितीच आहे. याचाच प्रत्यय या व्हायरल व्हिडीओमध्ये आहे. एक व्यक्ती जिच्या समोरून मृत्यू वेगाने आला पण तिला काहीच करू शकला नाही. मृत्यू त्या व्यक्तीला स्पर्शही करू शकला नाही. जसा मृत्यू आला तसा या व्यक्तीने स्वतःच स्वतःचा जीव वाचवला आहे.
नेमकं घडलं काय?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेली आहे, यादरम्यान एक कार भरधाव वेगाने येते आणि ती अचानक अनियंत्रित होते. गाडी इतक्या वेगाने आपल्या दिशेने येताना पाहून वृद्ध व्यक्ती लगेच तिथून उठते आणि भिंतीच्या मागे उभे राहते. त्यामुळे कार येऊन वृद्ध बसलेल्या जागेवर आदळते पण वृद्ध व्यक्ती तिथं नसते. तिथून ती वेळीच उठते म्हणून तिचा जीव वाचतो. या व्यक्तीला तिथून उठायला थोडा जरी वेळ झाला असता तरी या व्यक्तीचा जीव गेला असता.
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 22, 2024
हा व्हिडिओ X वर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
एका यूझरनं लिहिलं की, ‘सगळा नशीबाचा खेळ आहे भाऊ. इथं क्षणभरही उशीर झाला असता तर खेळ संपला असता.’ तर दुसऱ्यानं म्हटलं, ‘या वृद्धाची वेळ चांगली होती.