ताज्या बातम्या

Video लांडगा चिमुकलीला ओढत घेऊन जात होता, तेवढ्यात वडिल आले आणि….


दिवसभरातील बराचसा वेळ प्रत्येक जण सोशल मीडियावर घालवतो. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात, पाहण्यात त्यांचा वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सतत चर्चेत येत असतात.

अशातच एक श्वास रोखणारा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये एक लांडगा लहान मुलीच्या पायाला पकडून तिला ओढत नेत आहे. मात्र त्या लांडग्याशी सामना करत वडिल आपल्या मुलीला वाचवतात.

आपल्या मुलांसाठी आई-वडिल मोठमोठ्या संकटांचाही सामना करायला घाबरत नाही. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसून आलं. आपल्या मुलीला संकटात पाहून वडिल लांडग्याशीही लढतात आणि तिला वाचवतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घराबाहेर एक चारचाकी उभी आहे. व्यक्ती गाडीमध्ये काहीतरी करत होता तोच त्याच्या मागच्या रस्त्यावरुन एक लांडगा येतो आणि बाहेर उभ्या असलेल्या मुलीचा पाय ओढतो. तो तिचा पाय ओढून मुलीला नेणारच तो तिच्या ओरडण्याच्या आवाजानं वडिल अलर्ट होतात आणि तिला बघायला येतात. त्यांना लांडगा दिसतो ते त्याला हाकलतात आणि खाली पडलेल्या मुलीला उचलून घेतात. त्यानंतरही तो तेथून जाण्याचं नाव घेत नाही उलट पुन्हा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतो. मग तो त्याला दगडफेक करुन पळवून लावतो.

यानंतर तो आपल्या मुलीला घरात घेऊन जातो आणि नंतर जाड काठीने लांडग्याला मारण्यासाठी बाहेर पडतो. मात्र लांडगा तोपर्यंत निघून गेलेला असतो. @crazyclipsonly नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटचा वर्षाव होत असून अनेकांनी धाडसी वडिलांचं कौतुक केलंय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *