
नवी दिल्ली : पिटबुलने एका अडीच वर्षीय मुलीवर हल्ला केला. आजोबांच्या कुशीतून खेचत कुत्र्याने मुलीवर हल्ला केला आहे.
दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पिटबुलच्या हल्ल्याचं हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. अंगावर काटा आणणारं असा हा व्हिडीओ आहे.
दिल्लीच्या बुरारी परिसरातील ही घटना आहे. अडीच वर्षांची चिमुकली आपल्या आजोबांच्या कुशीत बसली होती. पिटबुल आला आणि त्याने चिमुकलीला आजोबांच्या कुशीतून खेचलं. तिला आपल्या जबड्यात धरलं. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता चिमुकली कुत्र्याच्या जबड्यात आहे. सुरुवातीला दोन लोक मुलीला पिटबुलच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण तो काही तिला सोडत नाही. आणखी काही माणसं त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. काही लोक चिमुकलीला धरून खेचत असतात तर काही लोक पिटबुलला मारताना दिसतात. इतकं मारूनही पिटबुल काही त्या मुलीला सोडत नाही. अखेर लोक कशीबशी मुलीच्या पिटबुलच्या जबड्यातून सुटका करतात
दिल्लीत अडीच वर्षीय मुलीवर पिटबुल डॉगचा हल्ला pic.twitter.com/yP076Vgb1j
— News18Lokmat (@News18lokmat) January 20, 2024
कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिला तसंच लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हा हल्ला इतका भयंकर होता की तिच्या एका पायाला फ्रॅक्चर झालं आहे.
अनेक देशांमध्ये पिटबुल डॉगवर बंदी आहे हेही खरे आहे. या देशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, न्यूझीलंड, इस्रायल, मलेशिया इ. याशिवाय बेल्जियम, जपान, जर्मनी, चीन, ब्राझीलच्या काही भागात निर्बंध आहेत. या देशांमध्ये पिट बुलचे संगोपन, व्यापार, प्रजनन यावर बंधने घालण्यात आली आहेत
हे ही वाचा
धीरेंद्र शास्त्री लंडन येथे बजरंग बली यांचा चमत्कार काय घडल ?