
चर्चेत राहण्यासाठी आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच काहीना काही विचित्र गोष्टी करत असतात. अशातच सोशल मीडियावर लोकांचे विविध, हटके, मजेशीर, व्हिडीओ समोर येत असतात.
अशातच एका तरुणीनं भर थंडी बाईकवर उलटं बसून फ्लाइंग किस देतानाचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल.
ट्रॅफिक नियम न पाळत, हेल्मेट न लावता, गाडीला नंबर प्लेटही नाही, अशा परिस्थितीत तरुणीचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये ती भल्या पहाटेच्या थंडीमध्ये गाडीवर साडी नेसून उलटी बसलीय आणि फ्लाइंग किस देत व्हिडीओ बनवत आहे.
इतनी ठंड में बिना स्वेटर के ये औरत बाइक पर बैठ कर अजीब हरकत कर रही 🥶😱 pic.twitter.com/Bp1X4k4YJs
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) December 30, 2023
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईकवर बसलेली एक तरुणी तिच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराला फ्लाइंग किस देताना दिसत आहे. दुसऱ्या बाईकवर बसलेली व्यक्तीही तरुणीच्या फ्लाइंग किसला फ्लाइंग किसने प्रतिसाद देत आहे. हातवारे करून पुरुषानं तरुणीला त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितलं. पण तरुणी त्याला नकार देते. ही तरुणी ज्या दुचाकीवर बसली होती त्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती आणि तरुणीला फ्लाइंग किस देऊन तिथून जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्याही दुचाकीवर नंबर प्लेट नव्हती. तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते.
@ChapraZila नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 23 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
धीरेंद्र शास्त्री लंडन येथे बजरंग बली यांचा चमत्कार काय घडल ?