हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात. कारल्यानंतर तोंडलीच्या भाजी खायची म्हटंली की आपण खाण्यासाठी नखरे करतो. तोंडलीला इंग्रजीत ivy-gourd असे म्हणतात.
परवालसारखे दिसणारी ही फळभाजी किंचित लहान आणि मऊ असते. यामध्ये असणारे अनेक पोषक घटक असतात मोठ्या आजारांशी लढण्यास मदत करतात. तोंडलीची भाजी आणि चटणी आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून खाल्ली जाते. आज आम्ही तुम्हाला तोंडलीच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. या भाजीला तुम्ही तुमच्या आहाराचा भाग करु शकता.
तोंडलीचे फायदे
मधुमेहास प्रतिबंध करते
मधुमेहाच्या रुग्णांसाठी तोंडली खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये अँटी हायपरग्लाइसेमिकचा प्रभाव असतो. जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो.
पचनासाठी महत्वाचे
तोंडलीची भाजी खाल्ल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये आढळणारे तंतू हे शरीरासाठी फायद्याचे असतात. मुख्य म्हणजे हे तंतू अन्न पचवण्याचे आणि मल शरीरातून बाहेर टाकण्याचे काम करतात. यामुळे अन्नपदार्थ चांगले पचते आणि आरोग्यही चांगले राहते. कर्करोग प्रतिबंधासाठी फायद्याचे
कर्करोग हा सर्वात धोकादायक आजार मानला जातो. रुग्णांच्या उपचारावर लाखो रुपये खर्च केले जातात. कर्करोग होण्यापासून रोखू शकतात असेही अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तोंडली होय. यामध्ये असणारे कार्सिनोजेनिक गुणधर्म या रोगापासून प्रतिबंध करतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरते:- शरीरातील प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. अशावेळी तोंडलीचे सेवन करून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए हे रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक परिणाम करते
हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे
तोंडलीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये अनेक प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स आढळतात. हे अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि मुख्यतः कार्डिओ संरक्षणात्मक क्रियाकलापांसारखे कार्य करतात. ते शरीरातील हृदयविकारास कारणीभूत असलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकतात.
संक्रमण प्रतिबंध करते
बहुतेक रोगांच्या प्रसाराचे मुख्य कारण संक्रमण आहे. मात्र तोंडली खाल्ल्याने संसर्गाचा धोका टाळता येतो. यात असणारे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म संक्रमणास कारणीभूत ठरतात. तसेच व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढतात आणि शरीराला संसर्गापासून वाचवतात.मज्जासंस्थेचे संरक्षण करते
मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारांना सामोरे जाण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स काम करते, असे एका संशोधनानुसार समोर आले आहे. ज्यामुळे मज्जासंस्था सुरक्षित आणि निरोगी राहते. दुसर्या एका अभ्यासानुसार, तोंडलीमध्ये व्हिटॅमिन-सी आढळते. जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करू शकते. त्यामुळे मज्जासंस्थेशी संबंधित समस्यांसाठीही तोंडलीचे फायदे प्रभावी आहेत.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी तोंडलीचा वापर केला जातो.यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. फायबरमुळे अन्न पचण्यासोबत भूकही शांत राहते.
थकव्यापासून आराम मिळतो
छोटी कामे केली की अनेकांना लगेच थकवा जाणवतो. आपल्यापैकी अनेकींना ही समस्या जाणवत असेल. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवू शकते. थकवा येण्याची समस्या दूर करण्यासाठी लोह उपयुक्त आहे. तोंडलीध्ये लोहाचे प्रमाण अधिक आढळते. शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.