वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं.
1.वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची खाणं महत्त्वाचं असतं.स्वयंपाकघरातील छोट्याश्या वेलचीचे तुम्हाला गुणकारी फायदे माहित आहेत का?
2.हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते.
3.वेलची पित्तावर रामबाण उपाय आहे. पित्त झालं असेल अथवा मळमळत असेल तर तोंडात वेलची ठेवावी. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असं असलं तरीही वेलचीमुळे पोटातील गॅसची समस्या दूर होते. अन्न पचण्यासाठी वेलची मदत करते.
4.अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. 5.वेलची खाण्यामुळे सेक्स लाईफ सुधारते असंही म्हटलं जातं. वेलचीत अॅन्टी बॅक्टिरियल गुण असतो. त्यामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते.
6.वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं आराम मिळतो.
7.बिर्याणी, पुलाव, किंवा घरातील गोड पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केल्यानं सुगंध आणि स्वाद वाढतो. 8.वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.
9.वेलची चहात टाकून घेतली की पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो.
10.चवीसाठी मसाले जेवढे आवश्यक असतात तेवढेच ते आरोग्यदायीही आहेत. मसाल्यांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही बहुगुणी वेलची रोज नक्की खायला हवी. त्यामुळे तुम्ही रोज निरोगी आणि फ्रेश राहाल.