Navgan News

ताज्या बातम्या

अल्पवयीन प्रियसीने प्रियकराला घरी बोलावले,त्यांच्या घरच्यांनी झाडाला बांधून पोलिसांना केला फोन नंतर काय झाले?


प्रियेसीला भेटायला गेलेला अल्पवयीन प्रियकर सापडल्यावर त्यांच्या घरातल्यांनी झाडाला बांधून पोलिसांना फोन करताच बांधलेल्या दोरीला हिसडा मारून पळत असताना विहिरी पडून प्रियकराचा मृत्यू झाला.शुभंकर संजय कांबळे (वय १७, रा.वाकीघोल, ता. राधानगरी, जि.कोल्हापुर)असे त्याचे नाव आहे.याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शिल्पा कांबळे (पाचर्डे ता. भुदरगड) यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसातून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी रात्री पाचर्डे येथील अल्पवयीन प्रियसीने प्रियकराला घरी बोलावले. तो तिला भेटायला आला होता. रात्री अडीच च्या सुमारास बाहेर गेलेले तिच्या घरची मंडळी घरी आली. घराजवळ आल्यावर तो आणि ती आनंदा ज्ञानु कांबळे यांचे घरासमोरील झाडाचे खाली उभे असलेले दिसले.

यावेळी त्या दोघांना तेथील हजर असलेल्या अशोक गोविंद कांबळे (रा. पाचर्डे) यांनी एकमेकांपासुन वेगळे केले. रंगराव कांबळे व संजय साताप्पा कांबळे यांनी त्याच्या उजव्या हाताला दोरी बांधुन त्यास गोविंद कृष्णा कांबळे यांच्या दारातील आंब्याच्या झाडाला बांधून घातले. त्यानंतर याची कल्पना पोलिस पाटील शिल्पा कांबळे यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान मयत शुभंकर याने पहाटे पावणे तीनच्या सुमारास हाताला हिसडा मारुन तेथुन अंधारातुन पळण्याचा प्रयत्न केला. गावातील लोक त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठी लागले. अंधारातून पळताना रस्ता ओलांडुन पुढे जात असताना अंधारात विहीर न दिसल्याने धोंडीराम गोविंद लाड यांच्या शेतातील विहीरीच्या तो पाण्यात पडला. त्याचा पाण्यात पडुन बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मयत शुभंकर याच्या घरची मंडळी घातपाताचा संशय व्यक्त करून पोलिस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यासाठी थांबून होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *