Navgan News

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा


पार्सलचे पैसे देण्याच्या वादातून डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये तुफान राडा झाल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे.

ही फ्री स्टाईल हाणामारी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात एका सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटाला पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावत दोघांवर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

पार्सलचे पैसे देण्यास ग्राहक तयार नव्हता

डोंबिवली लोढा हेवन परिसरात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुनील मिश्रा नामक व्यक्तीने ब्लिनकीत कंपनीकडून फूड पार्सल मागवले होते. एक हजार रुपयाचे पनीर आणि इतर खाण्याच्या वस्तू पार्सल मागवले होते. त्यानुसार ब्लिनकीत डिलिव्हरी बॉय सुनील मिश्रा यांचे पार्सल घेऊन त्यांच्या इमारतीत पोहोचला. मात्र इमारतीत पोहोचल्यानंतर पार्सलचे पैसे देण्यास मिश्रा तयार नव्हता.

पैशाच्या वादातून दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी

पैशाच्या देण्याघेण्यावरून सुनील मिश्रा आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद सुरू झाला. यादरम्यान डिलिव्हरी बॉयने आपल्या मालकाला सांगून दुकानाचा स्टाफ आणि इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर दुकानांमधील कर्मचारी आणि इतर डिलिव्हरी बॉय यांचा ग्राहक सुनील मिश्रा यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटात फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाली. संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *