
आष्टी : आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी,यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयातून बी.डी.एस.अर्थात दंत चिकित्सा पदवी संपादन करून सध्या औरंगाबाद घाटी येथे शासकीय दंत महाविद्यालयात फेलोशिप करीत असलेला कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचा चिरंजीव,डॉ.सय्यद हुमायुद्दीन यास अहमदनगर येथे पदवीदान समारंभात समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.मुंबई येथील डॉ.दत्तात्रय गावडे,तसेच डॉ.अनुराधा, डॉ.निखिल बोनले,डॉ.आसावरी यांच्या उपस्थिती,डॉ.राहुल आनंद यांच्या हस्ते सन्मानपूर्वक पदवीदान करण्यात आली. याबद्दल संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,सर्व प्राध्यापक, कर्मचारी,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर,सर्व पत्रकार,तसेच चिंचाळा येथील सरपंच दिगंबर पोकळे यांनी अभिनंदन केले आहे.