
जिल्हापरिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत गुरूवार दि.२८ रोजी सकाळी ८ वाजता शाळा पुर्वतयारी मेळावा संपन्न झाला. या शाळेत ईयत्ता पहिलीसाठी प्रवेशपात्र ३२ विद्यार्थी पात्र असुन त्यापैकी २५ विद्यार्थी शाळापुर्व तयारी मेळाव्यात सहभागी झालेले आहेत. या मेळाव्याच्या अनुषंगानेच सर्व प्रवेशपात्र व प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली.सर्व शिक्षकवृंद व मान्यवरांना “शाळेत जातो आम्ही” घोषवाक्य असलेली प्रेरणा टोपी घालून ,हातात घोषवाक्य असलेली फलक घेऊन”प्रभातफेरी शाळा-मारोती मंदिर-बाजारतळ -ढवळे चौक मार्गे शाळा काढण्यात आली. या मेळाव्याच्या अनुषंगानेच विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी वेगवेगळे ७ विभाग तयार करण्यात आले होते ,यामध्ये नांवनोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषाविकास व गणन पुर्वतयारी , पालक मार्गदर्शन असे ७ टेबल तयार करून येथील शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना परीपुर्ण अशी माहिती दिली. याचठिकाणी उभारलेल्या सेल्फी पाॅईंट मध्ये विद्यार्थ्यांनी फोटो काढले शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी व्यासपीठावर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख लिंबागणेश श्री. शेळके एस.एन. केंद्रीय मुख्याध्यापक मोराळे एस.एल, शिक्षक चव्हाण आर.डी, श्रीमती कदम एस.एन, चौरे बीड.बी, आगाम एस.बी. श्रीमती कुलकर्णी एम.बी.,पुरी ए.आर. अंगणवाडी सेविका श्रीमती तागड, सौ. आबदार, श्रीमती निर्मळ, उपसरपंच शंकर वाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश निर्मळ ,सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पुजन करण्यात आले, मेळाव्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोराळे यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक आदिंची यांची समयोचित भाषणे झाली , शेळके एस. एन.यांनी अध्यक्षीय समारोप केला, मेळाव्याचे सूत्रसंचालन शिक्षक अमर पुरी यांनी केले. आभारप्रदर्शन श्रीमती कुलकर्णी यांनी केले. अत्यंत आल्हाददायक, उत्साही वातावरणात केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबागणेश शाळेचा शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न झाला. मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक,शिक्षक, ग्रामस्थ शिक्षणप्रेमी डाॅ.गणेश ढवळे आदिंनी परिश्रम घेतले.