PM Modi And Putin: “प्रिय मित्र…” पीएम मोदी पुतिन यांच्या निवासस्थानी पोहचताच काय घडलं ?
रशियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सोमवारी रात्री मॉस्कोजवळील रशियन राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी अनौपचारिक बैठक झाली.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पीएम मोदी यांचे व्लादिमीर पुतिन स्वागत करत असल्याचे दिसत आहे.
सोमवारी रात्री पोस्ट करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी पुतिन यांच्या निवासस्थानी आल्यावर दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.
🇷🇺🇮🇳 At the Novo-Ogaryovo residence of the President of Russia near Moscow, Vladimir Putin and Indian Prime Minister @narendramodi, who is on a two-day official visit to Russia, hold an informal meeting.#DruzhbaDosti 🤝 #RussiaIndia pic.twitter.com/JkedUdX9iJ
— MFA Russia 🇷🇺 (@mfa_russia) July 8, 2024
पुढे, पुतिन यांनी पीएम मोदी रशिया दौऱ्यावर आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाले, “प्रिय मित्र, तुमचे स्वागत आहे. तुम्हाला पाहून मला खरोखर आनंद झाला आहे.”
“मॉस्कोजवळील रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी, व्लादिमीर पुतिन आणि रशियाच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असलेले भारतीय पंतप्रधान @narendramodi यांची अनौपचारिक बैठक झाली,” असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर म्हटले आहे.