दिल्लीमध्ये या महिन्यात लहान मुलांना श्वान चावल्याची तिसरी धक्कादायक घटना घडली आहे. शाहदरा जिल्ह्यातून ही भयंकर घटना समोर आली आहे. चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली.
दिल्ली-एनसीआर में लगातार बढ़ रहा कुत्तों का आतंक… इस बार पूर्वी दिल्ली के विश्वास नगर में पालतू कुत्ते ने दो साल के बच्चे को नोंचा। इससे पहले बुराड़ी, रोहिणी में भी पिटबुल कुत्ते ने बच्चों को अपनी शिकार बनाया है।#delhinews #Dogbite #DogAttack #DelhiNCR pic.twitter.com/LDVhDiyrHG
— Naveen Prajapati (@KumarNaveen93) January 24, 2024
मुलगा वडिलांसोबत मंदिरातून परतत होता. यावेळी त्याच्या शेजाऱ्याने आपल्या पाळीव श्वानाला बाहेर काढण्यासाठी घराचा दरवाजा उघडला. गेटमधून बाहेर येताच शेजारच्या पाळीव कुत्र्याने मुलावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलासह घराबाहेर उभी असल्याचं दिसत आहे. तेव्हा समोरून धावत आलेल्या श्वानाने मुलावर हल्ला केला. ती महिला आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. लेकाला वाचवण्यासाठी आईने जीवाची बाजी लावली. याच दरम्यान ती रस्त्यावर पडली.
श्वानाचा मालकही हे सर्व थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण श्वान पुन्हा मुलावर हल्ला करतो. मुलाच्या वडिलांनी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे. याआधी देखील श्वानाने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.