खेळ

टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यावर प्रशिक्षकावीना खेळावे लागणार, VVS Laxman नाही जाणार


India vs Ireland T20I Series : दुखापतीतून सावरणारा जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आयर्लंड दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करत आहे. युवा खेळाडूंची फौज असलेल्या या संघाचे नेतृत्व बुमराहकडे सोपवले गेले आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती दिली गेली आहे. पण, व्ही व्ही एस लक्ष्मणही या दौऱ्यावर जाणार नाही. त्यामुळे भारतीय संघ प्रशिक्षकावीना या दौऱ्यावर खेळेल, परंतु सितांषू कोटक आणि साईराज बहुतुले हे सपोर्ट स्टाफ सदस्य संघासोबत असणार आहेत.

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ३ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. १८ ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होतेय. दुसरा व तिसरा ट्वेंटी-२० सामना अनुक्रमे २० व २३ ऑगस्टला खेळवला जाईल. तिन्ही सामने डब्लिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळवले जातील.

भारताचा टी२० संघ- जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसीध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती

या वर्षी मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या T20I मालिकेनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी केलेल्या टाइमलाइननुसार, बुमराह आधी ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठीच परतण्याची अपेक्षा होती. मात्र, बीसीसीआयने मेडिकल अपडेट जारी करून बुमराह लवकरच तंदुरुस्त होण्याची आशा व्यक्त केली होती. त्यानुसार त्याचे कमबॅक झाले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *