नवी दिल्ली – भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट मॅचचा नेहमीच दोन्हही देशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. अशात जर हा सामना वर्ल्डकपमधील सेल तर मग क्रिकेट प्रेमींमध्ये आधीपासूनच जोरदार तयारी सुरु होते.नुकतंच बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी यांच्या होणाऱ्या वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तानच्या मॅचवर भाष्य केलं आहे.
बागेश्वर बाबांनी हा सामना कोण जिंकेल याबाबत सांगितलं आहे.
वनडे विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी कशी असेल, हे स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतरच कळेल. पण, बागेश्वर बाबांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे आधीच भाकीत केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भारत-पाकिस्तान वादावरील त्यांचे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
भारत-पाकिस्तान सामना यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. मात्र बदललेल्या वेळापत्रकात त्याची तारीख बदलून 14 ऑक्टोबर करण्यात आली आहे.बागेश्वर बाबानी केलेले भाकीत हे भारत पाक सामान्यांची तारीख बदलण्यापूर्वीचे असल्याचे समजते. यावेळी बागेश्वर बाबा एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते त्या दरम्यान त्यांना दोन टीम्समधील कोणता संघ जिंकेल असं विचारण्यात आलं होते.
बागेश्वर बाबा यांना मुलाखतीदरम्यान तुम्ही क्रिकेट पाहता का ? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हो असं उत्तर दिल. त्यानंतर त्यांना परत पाक या सामन्यात कोण जिंकेल असं विचारण्यात आलं त्यावर ते म्हणाले,””बाप.. बाप होता है”. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतचं जिंकेल असे संकेत बागेश्वर बाबांनी दिल्याचे समजते.