शेत शिवार

केळी पीक विम्याची रक्कम मिळेना; राजकीय नेत्यांना गावबंदी


जळगाव : केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. केळीच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना (farmer) अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. यामुळे केळी पीक विमा रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्याना गावा बंदी करण्याचा निर्णय रावेर ( Raver) तालुक्यातील तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी घेतला. गावकऱ्यांच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात ८१ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित केळी पीक विमा काढला होता. यापैकी दहा ते पंधरा हजार शेतकऱ्याना केळी पीक विमा (Banana Crop Insurance) माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासन दरबारी तसेच राजकीय नेत्यांना भेटून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसून शेतकऱ्यांना पीक विमा रकमेची प्रतीक्षा आहे.

राजकीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही कोणताही मार्ग निघत नसल्याचे लक्षात आल्यावर आता या शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय एक बैठकीमध्ये घेतला. तांदलवाडी येथील केळी (Banana Crop) उत्पादक शेतकऱ्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार आणि विमा कंपनी बाबत संताप व्यक्त केला आहे.

“मी श्रीदेवीच्या प्रेमात होतो”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *