पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोल्ड वार सुरू असल्याचं विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं होतं.
राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कॉल्ड वॉर सुरू आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.
I did not interfere in the work of Chief Minister Eknath Shinde – Ajit Pawar
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “विजय वडेट्टीवार सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर विराजमान आहे. हे एक जबाबदार पद आहे. त्यामुळं त्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीनं जबाबदारीनं बोललं पाहिजे.
उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलणं योग्य नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांमध्ये हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी प्रकल्प आणि विकास कामांचा आढावा घेऊ शकतो. त्यात तुम्हाला काय त्रास होत आहे? काय माहित.”
आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण झाले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवापासूनच थोडी तब्येत खराब आहे.
आम्ही सगळ्यांनी सांगितलं, म्हणून मुख्यमंत्री शिंदे दोन-तीन दिवस आराम करत आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या तब्येतीची काळजी स्वतः घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळं सर्वांनी समजून घ्यायला हवं.”
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केलं होतं. ते म्हणाले, “अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खात्याशी अजित पवारांचा काही संबंध नसताना त्यांनी प्रोजेक्ट आणि विकास कामांचा आढावा घेतला आहे. म्हणजेच वॉर रूममध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे.”
Ajit Pawar | मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर सुरू? पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut | देशद्रोह कायद्यावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, “ब्रिटिशांपेक्षा भयंकर.”
Ashish Shelar | “समर्पणाचा सूर्य तुमच्या अहंकाराला.”; आशिष शेलारांची ठाकरे गटावर बोचरी टीका
Prakash Ambedkar | पीएम नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक ठरतायं – प्रकाश आंबेडकर
Uddhav Thackeray | “अमित शाह मोदींची वैयक्तिक गरज म्हणून.”; ठाकरे गटाची नरेंद्र मोदींवर खोचक टीका
Ajit Pawar | उचलली जीभ लावली टाळ्याला; अजित पवारांची विजय वडेट्टीवारांवर टीका