पुणे

अजित पवार यांनी केला मेट्रोने प्रवास; प्रवाशांसोबत साधला संवाद


पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या (Ajit Pawar) लोकार्पण सोहोळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असून त्यापूर्वी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत त्यांनी मेट्रोने प्रवास केला.

तर, यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत संवाद देखील साधला.

 

पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि उड्डाण पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 

तर या कार्यक्रमापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रास्तावित मेट्रोसह दुमजली उड्डाणपुलाच्या कामाबाबत अजित पवार यांनी पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे अधिकार्‍यासोबत बैठक घेतली.

त्या बैठकीनंतर चांदणी चौकातील कार्यक्रमाच्या ठिकाणी (Ajit Pawar) अजित पवार यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *