महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मुंबई आणि ठाणे पट्ट्यात पत्रकारांच्या एक्झिट पोलमधून धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार मुंबईत 20 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तर 16 मतदारसंघात महायुती आघाडीवर होती, तर ठाणे आणि कल्याण पट्ट्यात भाजप-शिवसेनेने आघाडी घेतली होती.
विधानसभा निवडणुकीत तज्ज्ञ पत्रकारांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये मुंबई ठाण्यातल्या 54 जागांपैकी 16 ते 19 जागांवर महायुतीचा तर 26 ते 30 जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल. तर 4 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार जिंकू शकतात. तर एका जागेचा निकालाबाबत अनिश्चितता आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे आणि कोकणातला गड महायुतीने राखला होता. मुंबई आणि कोकण भागातल्या एकूण 65 जागांपैकी भाजपला 27, शिवसेनेला 27, राष्ट्रवादीला 6 आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. तर अन्य आणि अपक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला होता.