राजकीय

पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले


कोल्हापुरातून प्रचाराची सुरूवात केली आहे. राधानगरी इथे झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत. शिवाय महायुती सरकारवरही हल्लाबोल केला आहे.

पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे हे आक्रमक दिसले. शिवाय महाविकास आघाडीचे सरकार आणणार म्हणजे आणणारच असेही ते म्हणाले. बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा भाजपने दिली आहे. पण आम्ही तुटू देणार नाही. महाराष्ट्र लुटू देणार नाही ही घोषणा देतो. मशाल धगधगणार आणि खोकेवाले जळून भस्म होणार असेही ठाकरे या वेळी म्हणाले.

ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या जाहीर सभेत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. मतदारांनी मविआचं सरकार आणण्यावे असे आवाहन ही त्यांनी केले. युतीचं सरकार असताना मनोहर जोशी हे मुख्यमत्री होतो. त्यावेळी सरकारने पाच जिवनावश्यक वस्तूंचे दर हे स्थिर ठेवले होते. मविआचं सरकार आल्यास पाच जिवनावश्यक वस्तूंची दर स्थिर ठेवले जातील अशी घोषणा यावेळी ठाकरे यांनी केली. त्यानंतर मुलींना शिक्षण हे मोफत आहे. त्याच प्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल अशी दुसरी घोषणा त्यांनी केली. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर प्रत्येक जिल्ह्यात उभी करणार ही तिसरी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या सभेत केली.

शिंदे-फडणवीस- पवारांवर हल्लाबोलो

या सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. महिलांची अब्रू लुटली जात आहे. महागाई वाढत आहे. त्यात लाडकी बहीण म्हणत एक नाही तर तीन- तीन भाऊ पुढे येत आहेत. एक देवा भाऊ, दुसरा दाढी भाऊ, तिसरा जॅकेट भाऊ. हे भाऊ वैगरे काही नाहीत. ते जाऊ तिथं खाऊ आहेत. असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. तुमच्या मनात एक राग आहे. गेली अडीच वर्ष तो राग धगधगत होता. आता या खोके सरकारला जाळून भस्म करण्याची वाट तुम्ही पाहात होते. ती वेळ आता आली असे ठाकरे यावेळी म्हणाले. मी महाराष्ट्रासाठी लढतोय. गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही. हारमखोर पणा रक्तात नाही. जे मोदी शाहांना महाराष्ट्र लुटण्यासाठी मदत करत आहेत ते महाराष्ट्र द्रोही आहेत असा आरोपही यावेळी ठाकरे यांनी केला.

मोदी- शाह यांच्यावरही टीकेची झोड

ही निवडणूक महाराष्ट्राची ओखळ ठेवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पुढचे दहा पंधरा दिवस मोदी आणि शाह यांनी महाराष्ट्रत यावं. ही निवडणूक महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे की मोदी शाह यांचा आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. मोदी शाह महाराष्ट्राला चालणार आहेत का? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी केला. जे कोणी मोदी शाह यांची पालखी वाहात आहेत ते महाराष्ट्र द्रोही आहेत असंही ते म्हणाले. निवडणुकीनंतर मोदी शाह महाराष्ट्रातून पराभवाचं कडू लिंबू घेवून जातील असेही त्यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *