राजकीय

Sharad Pawer : हे मोदींना चालेल का? लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांचा थेट सवाल


Sharad Pawer : सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेवर शरद पवारांनी भाष्य केलंय. ‘सरकारच्या तिजोरीत काहीच नाही, निवडणूक पूर्वी एखादा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय होईल.

यापूर्वी सत्ता असताना का निर्णय घेतले का नाही’ असं म्हणत लाडकी बहिण योजनेवर शरद पवार यांनी टीका केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशापूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

 

‘सरकारच्या तिजोरीत काहीच नाही, निवडणूक पूर्वी एखादा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय होईल. यापूर्वी सत्ता असताना का निर्णय घेतले का नाही. मुळात
नरेंद्र मोदी यांची भाषा पाहता मोफत दिल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ते सतत म्हणायचे की रेवडी आहे. हे काही रेवडीचं वाटप आहे. पण अशा वाटपामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ही लोकांची फसवणूक आहे. ते त्यांच्या वक्तव्यावर जर ठाम असतील हा जो काही निर्णय घेतला त्यावर ते स्वच्छ भूमिका घेतील, असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला

 

‘तो दिवा मी जेलमध्ये पाहिला आहे’

 

अमित शाह यांच्यवर बोलणे म्हणते सूर्याला दिवा दाखवण्या सारखे आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती, त्यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘तो दिवा मी जेलमध्ये पाहिला आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की काही झालं तर त्यामागे शरद पवार आहेत’ असं म्हणत पवारांनी बावनकुळेंच्या विधानाची खिल्ली उडवली.

छत्रपती संभाजीनगर नामांतरनंतर त्याचे परिणाम मराठवाड्यात पाहायला मिळाले. माझी ती चूक होती. मी मुंबईमध्ये बसून तो निर्णय घेतला होता, असं म्हणत पवारांनी नामांतराच्या निर्णयावर कबुली दिली.

 

‘मराठवाड्यात निर्माण झालेली परिस्थिती सर्वांनी सोडवली पाहिजे’

 

‘आम्ही सरकारला सुचवलं जरांगे आणि ओबीसी नेते यांना बोलावा. आमच्या सारख्या लोकांना बोलावून प्रश्न सोडवावा. मराठवाड्यात निर्माण झालेली परिस्थिती सर्वांनी सोडवली पाहिजे. मराठा आरक्षणावर अनेकदा बोललो. काही गोष्टी अशा आहेत की मला दुसऱ्या गोष्टींची काळजी आहे. लोकांमध्ये अंतर वाढत आहे का, अशी स्थिती आहे. मराठवाड्यातील काही दोन तीन जिल्ह्यात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एका जातीचा लोकांना दुसऱ्या जातीच्या व्यक्तीच्या हॉटेलमध्ये जात नसेल तर गंभीर आहे, असं म्हणत पवारांनी चिंता व्यक्त केली.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *