नवगण विश्लेषण

बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा? तुम्हाला माहितीय का?


महाराष्ट्रात बदलापूरमध्ये एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून संतापाची लाट उसळली. या सर्व प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. बलात्कारांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालावेत आणि आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवलं जावं अशी मागणी नागरिक करत आहेत.

दुसरीकडे कोलकात्यातील आर. जी. कर मेडिकल कॉलेज ॲंड हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ ज्युनिअर डॉक्टर आंदोलन करत आहेत. कोलकाता पोलिसांनी लॉकेट चॅटर्जीसह तिघांना चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

त्यामुळेच कठोरात कठोर शिक्षा काय असावी याची चर्चा होत आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? भारतासह इतर अनेक देशांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे, जाणून घेऊ या.

दक्षिण कोरिया हा देश तेथील नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी ओळखला जातो. या देशात बलात्कार करणाऱ्याला कोणतीही माफी मिळत नाही. सुरक्षा दलांकडून गोळ्या झाडून त्याला ठार मारलं जातं.

सौदी अरेबियामध्ये बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाते. बलात्कार करणाऱ्या पुरुषाला जनतेसमोर उभं करुन त्याचा शिरच्छेद केला जातो.

बलात्कार करणाऱ्याला चीनमध्ये थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे. बलात्काराच्या काही गुन्ह्यांमध्ये दोषी पुरुषाचं गुप्तांग कापण्याची शिक्षाही केली जाते.

नेदरलॅंड या देशात परस्परांच्या परवानगीशिवाय किस करणंही अपराध मानला जातो. असं करणाऱ्यांना चार ते 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

इराकमध्येही बलात्कार करणाऱ्या पुरुषांना कठोर शिक्षा केली जाते. बलात्कार करणाऱ्या पुरुषाचा जीव जाईपर्यंत त्याला दगडाने ठेचून मारलं जातं.

भारतात जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि 375 अंतर्गत बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे. मृत्युदंड, जन्मठेप आणि किमान पाच वर्षे तर कमाल 10 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *