BODY COUNT : आजकाल बरेच शब्द असे असतात जे ऐकल्यानंतर आपल्याला नॉर्मल वाटतात, पण त्याचे अर्थ वेगळे असतात. खरं तर आपल्या अर्थ माहिती नसल्यानेच ते शब्द नॉर्मल वाटतात. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना असे शब्द नक्कीच ऐकले असतील.
असाच एक शब्द आहे ‘बॉडी काउंट.’ तुम्ही हा शब्द ऐकला असेल; पण ‘बॉडी काउंट’ या शब्दाचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला रिलेशनशिपशी संबंधित या विषयाची माहिती देणार आहोत. आम्ही एका पॉडकास्टबद्दलदेखील सांगणार आहोत ज्यामध्ये एका मुलीने तिच्या वडिलांसमोर बॉडी काउंट सांगितला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती.
काय असतो बॉडी काउंट?
बॉडी काउंट म्हणजे एका व्यक्तीने इतर किती जणांबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप ठेवली आहे त्याचा आकडा. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सेक्शुअल गरजांसाठी कोणी किती वेळा बेड शेअर केला आहे याला बॉडी काउंट म्हणतात. तो कोणाचा जास्त असू शकतो किंवा कोणाचा शून्य असू शकतो, या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलं आहे.
मुलीने सांगितला तिचा बॉडी काउंट
यू-ट्यूबवर ‘व्हॉटेव्हर क्लिप्स’ नावाच्या चॅनेलवर एक पॉडकास्ट झाला. त्यामध्ये एक मुलगी आणि तिच्या वडिलांना बोलावण्यात आलं होतं. संभाषणात जेव्हा मुलीला तिच्या बॉडी काउंटबद्दल विचारण्यात आल्यावर ती थोडीशी संकोचली. तिचे वडील तिला म्हणाले की तू सांगू शकतेस, तेव्हा तिने 8 असं उत्तर दिले. आपल्या मुलीचा बॉडी काउंट 8 असल्याचं कळल्यावर तिचे वडील चकित झाल्याचं पाहायला मिळालं.
बॉडी काउंट का करतात?
बॉडी काउंट का करतात याचं ठोस कारण माहीत नाही; पण खाली दिलेली कारणं असू शकतात. त्यासाठी बॉडी काउंट केला जात असू शकतो.
– काही जणांना त्यांची आणि समोरच्या व्यक्तीची सेक्स पॉवर जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो. त्यामुळे ते त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करतात.
– असे बरेच जण आहेत ज्यांना हे अभिमानाचं काम वाटतं आणि ते त्यांचा बॉडी काउंट वाढवण्यासाठी आणि स्वतःला साहसी दाखवण्यासाठी असं करतात.
– काही वेळा एखाद्याशी नातेसंबंध बनवण्यासाठी पीअर प्रेशर असू शकतं.. यामध्ये त्या व्यक्तीची हिंमत पाहिली जाते.