महत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत मोठी बातमी समोर, राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे?


मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळात यावरून काही गट निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली असली तरी मंत्री छगन भुजबळ यांचा याला विरोध आहे.

यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिक घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिलेला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप तो स्वीकारला नसल्याची माहिती आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी यांच्याबाबत छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

याबाबत भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी असल्याचं भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये, असेही ते म्हणाले.

ओबीसींच्या हिताचं सरक्षण करणं ही प्राथमिकता असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १६ नोव्हेंबर २०२३ ला राजीनामापत्र दिल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मंत्री असलेले छगन भुजबळ नाराज झाले आहेत. यामुळे मला राजीनामा देयची वेळ आली तरी लढणार असे भुजबळ यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी आता संघर्ष करायला सुरुवात केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *