मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर पहिल्यांदा भाष्य केलं. “महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्राने एकत्र बसून मराठा समाज प्रश्न सोडवला पाहिजे. सरकार बघ्याची भूमिका घेतायत का?
असा प्रश्न मला पडला आहे. कारण अजून कोणतीच पावलं उचलली नाहीत”, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शिर्डी दौऱ्यात केलेल्या टीकेला उत्तर दिलं. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्रानं एकत्र बसून मराठा समाजाचा प्रश्न सोडवला पाहिजे. सरकार बघ्याची भुमिका घेतायत का? असा प्रश्न मला पडला आहे, कारण अजून कोणतीच पावलं उचलली नाहीत.” तसेच, पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांच्या बारामतीतील रद्द झालेल्या दौऱ्यावरही भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी माळेगावला जाणं टाळलं हे योग्य आहे. वातावरण गरम असताना तिथं न जाणं हेच योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.