महाराष्ट्रमुंबई

मुंबई, पुण्यासह भारतील ही आहे 7 ठिकाणं, जिथे कुणीच जात नाही, येतात वेगवेगळे आवाज


मुंबई : भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. काही ठिकाणचा निसर्ग, काही वास्तूंचं स्थापत्य, काही ठिकाणांचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासारखं असतं; मात्र काही जागा भीतिदायकही असतात.

भारतात अशी काही ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी जाऊन पर्यटकांना विचित्र अनुभव येऊ शकतो. जे कमकुवत मनाचे आहेत, त्यांनी अशा ठिकाणांना भेट देण्याचं टाळावं. भारतातल्या भीतिदायक ठिकाणांमध्ये काही वाडे, वास्तू, महाल, हॉटेल यांचा समावेश आहे. त्यापैकी काही ठिकाणांची माहिती घेऊ.भानगढ किल्ला, राजस्थान – हे भारतातलं सर्वांत भीतिदायक ठिकाण समजलं जातं.

त्यामागे त्या किल्ल्याचा इतिहास आहे. राजस्थानमध्ये असलेला 17व्या शतकातला हा किल्ला शापित असल्याचं मानलं जातं. या किल्ल्यावर अंधार पडल्यानंतर प्रवेश दिला जात नाही. वेगवेगळे आवाज आणि विचित्र घटना घडल्याचे किस्से आहेत.

त्यामुळे अशा गोष्टींची आवड असणारे लोक हा किल्ला पाहायला आवर्जून येतात, ‘न्यूजेबल एशियानेट न्यूज’नं याबद्दल माहिती देणारं वृत्त दिलं आहे.ब्रीज राज भवन हेरिटेज हॉटेल, कोटा – राजस्थानातल्या कोटामधलं हे हॉटेल म्हणजे पूर्वी एक राजवाडा होता. तिथे मेजर बर्टन यांचं भूत असल्याचं सांगितलं जातं. स्वातंत्र्यासाठीच्या पहिल्या उठावावेळी ते मारले गेले; मात्र त्यांचा आत्मा अजूनही त्या वाड्यात राहतो असं म्हणतात. यामुळे आज हॉटेल म्हणून प्रसिद्ध असलेला तो वाडा झपाटलेला आहे.

अनेक पर्यटकांनी तिथे काही विचित्र पाहिल्याचं नोंदवलेलं आहे.जमाली कमाली मशीद, दिल्ली – दिल्लीच्या मेहरौली उद्यानात असलेली ही मशीद याच प्रकारातली आहे. सूफी संत जमाली आणि कमाली नावाची एक अनोळखी व्यक्ती यांच्या आत्म्यानं त्या परिसराला झपाटल्याचं बोललं जातं. या ठिकाणी प्रसन्न वाटत नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई – मुंबईतल्या प्रसिद्ध ताज पॅलेस हॉटेलमध्येही झपाटलेपणाचा अनुभव येतो. हेरिटेज विभागात काही विचित्र अनुभव आल्याचं काही पर्यटकांनी नोंदवलं आहे.

दंतकथा आणि सुंदर स्थापत्य यामुळे अनेक जण या हॉटेलला भेट देतात.कुलधारा, राजस्थान – राजस्थानातल्या कुलधारा या गावाभोवती एक गूढ वलय आहे. एकोणिसाव्या शतकात ते गाव ओसाड झालं होतं. स्थानिकांच्या माहितीनुसार, या गावातले रहिवासी अचानक एका रात्रीत गायब झाले. या गावाचे अवशेष पाहताना अनेक पर्यटकांना भयावह शांतता आणि काही तरी विचित्र जाणवतं.शनिवारवाडा, पुणे – मराठ्यांचं वैभव असलेला ऐतिहासिक शनिवारवाडादेखील या गूढकथांपासून सुटलेला नाही.

शोकांतिका आणि विश्वासघाताचा साक्षीदार असलेला हा वाडा तरुण राजपुत्राच्या आत्म्यानं पछाडलेला असल्याची अफवा आहे. त्याच्या मृत्यूचा साक्षीदार असलेल्या वाड्यातून निरनिराळे आवाज ऐकू येतात, असं म्हटलं जातं.डुमस बीच, गुजरात – सूर्यास्ताचं विहंगम दृश्य आणि काळ्या रंगाच्या वाळूसाठी गुजरातमधला डुमस समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. त्याशिवाय तो गूढही आहे. एके काळी तो भाग अंत्यविधी करण्यासाठी वापरला जात होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी तिथे कुजबूज किंवा विचित्र आवाज येतात, असं म्हटलं जातं.भारतात सर्व प्रकारची पर्यटनस्थळं आहेत. समुद्रकिनारे, घाट, दऱ्या, डोंगर याबरोबरच गूढ आणि झपाटलेल्या काही जागाही आहेत. दंतकथा, स्थानिक लोकांची माहिती आणि पर्यटकांना आलेले अनुभव त्या ठिकाणांच्या गूढतेमध्ये भर घालतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *