मुंबई : विख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या अकस्मात मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टी शॉकमध्ये होती. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का होता, ते तर अक्षरश: कोसळले.
गेली अनेक दशके मराठी, हिंदींतील विविध चित्रपटांचे भव्यदिव्य सेट उभारणाऱ्या नितीन देसाई यांना अनेक महत्वपूर्ण पुरस्कार मिळाले होते. अत्यंत कष्टाने उभ्या केलेल्या त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्ये (death inN.D.studio) नितीन यांनी स्वत:चे जीवन संपवले. आर्थिक तंगी आणि स्टुडिओ गमावण्याच्या भीतीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नैना देसाई आणि मानसी, तन्वी, कांत या मुलांनी वडिलांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.
नितीन देसाई हे त्यांची पत्नी नैना यांच्यासोबत मुंबईत राहून एन.डी.स्टुडिओचे कामकाज सांभाळायचे तर त्यांची मुलं परदेशात होती. आयुष्यात हेच कर आणि तेच कर असं नितीन देसाई यांनी कधीच त्यांच्या मुलांना सांगितलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला नाही. त्यांची छोटी मुलगी तन्वी ही फॅशन डिजायनिंगचे शिक्षण घेत असून 12 नंतर ती पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील अभ्यासासाठी ती अमेरिकत गेली आणि शिकता-शिकता ती तिचे कामही सांभाळत आहे
काय करतात नितीन देसाई यांची मुलं ?
आपल्या आई-वडिलांनी जशी मेहनत करून आपल्याला शिकवलं तसंच आपल्या मुलांनाही उत्तम शिक्षण मिळावं असा नितीन देसाई यांचा मानस होता. त्यांचा मुलगा कांत, हा अमेरिकेत त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे, तर मोठी मुलगी मानसी हिने स्क्रिप्ट, डायरेक्शन आणि प्रॉडक्शनचे शिक्षण घेतले असून ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. हॉलिवूडमधील प्रख्यात स्टुडिओ वॉर्नर ब्रदर्ससोबतही मानसीने काम केले आहे. वडिलांच्या अकस्मात निधनानंतर मानसी हिनेच देसाई कुटुंबियांतर्फे पहिलं स्टेटमेंट दिलं होतं.
मुलांना दिला होता मोलाचा सल्ला
काही महिन्यांपूर्वी नितीन देसाई यांनी त्यांची लेक मानसी हिचे तिचा बॉयफ्रेंड जॉर्डनसोबत धूमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. त्यांच्या जवळच्या लोकांच्या सांगण्यानुसार, मुलांनी आपली बिझनेसमध्ये मदत करावी, यासाठी नितीन देसाई यांनी त्यांच्या मुलांवर कधीच दबाव टाकला नाही. तुमचं आयुष्य एन्जॉय करा, खूप शिका, मी आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असां त्यांनी मुलांना सांगितलं होतं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम करत राहीन, पण तुम्ही जे ज्ञान मिळवाल त्याचा स्वत:साठी आणि समाजासाठीही उपयोग करा, असा सल्लाही नितीन यांनी त्यांच्या मुलांना दिला होता.