मुंबई :आशिया कप 2023 स्पर्धेला काही दिवस बाकी असून यजमान पाकिस्तान संघाने या स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कपसाठी जो संघ जाहीर केला आहे तोच संघ अफगाणिस्तानविरूद्धची वन डे मालिका खेळणार आहे.
पाकिस्तान निवड समितीने वर्ल्डकप डोळ्यासमोरवर ठेवत संघात एका विस्फोटक खेळाडूची निवड संघात केली आहे. आशिया कपमध्ये हा खेळाडू टीम इंडियाविरूद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचं समजत आहे.
कोण आहे तो घातक खेळाडू?
पाकिस्तान संघाने निवड केलेल्या खेळाडूने जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘पाकिस्तान सुपर लीग’ मध्ये धमाकेदार कामगिरी केलीये. पठ्ठ्याने एका ओव्हरमध्ये 34 धावा काढल्या होत्या. लीगमध्ये कराची वारियर्सविरूद्ध खेळतान या खेळाडूने अवघ्या 20 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती. उसामा मीर असं खेळाडूचं नाव आहे. आशिया कपआधी पाकिस्तान संघाचा खेळाडू अशा प्रकारे फॉममध्ये येणं ही टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.
पीएसएलमध्ये मजबूत कामगिरी केल्यानंतर तो चर्चेत आला होता. मुलतान सुलतान या संघाकडून खेळत असलेल्या उसामा मीर याने फक्त बॅटींगनेच नाहीतरस बॉलिंगनेही कमाल करून दाखवली. सामन्यांमध्ये त्याॉने 7.93 च्या ईकोनॉमीने 17 विकेट्स घेतल्या होत्या.
उसामा याने पाकिस्तान संघाकडून पदार्पण केलेलं आहे. मे महिन्यामध्ये 2023 साली म्हणजेच याच वर्षी त्याने न्यूझीलंडविरूद्धच्य वन डे मालिकेमध्ये पदार्पण केलेलं. तीन सामने खेळताना त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या