Manoj Jarange Patilमराठा आरक्षणमहत्वाचेमहाराष्ट्र

आरक्षणाचा कायदा झाल्यानंतरच कुटुंब प्रमुख म्हणून घरी येणार: जरांगे पाटील 5 महिन्यानंतर घरी परतले


जालना : मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून सरकारशी दोन हात करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तब्बल 5 महिन्यानंतर त्यांच्या अंकुशनगर शहागड येथील राहत्या घरी परतले

मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय घरी जाणार नाही अशी शपथ जरांगे यांनी घेतली होती.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेले 5 महिने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे आपली मागणी लावून धरली होती. यासाठी त्यांनी कधी गरज पडल्यास उपोषणाचा खडतर मार्गही अवलंबला. त्यांनी सरकारला जेरीस आणत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाच्या पदरात मराठा आरक्षणाचं हे दान टाकलं आहे.

अखेर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे घरी जाण्याचा हट्ट धरला त्यामुळे जरांगे आज त्यांच्या राहत्या घरी परतले यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. जरांगे घरी परतल्यानंतर त्यांच्या पत्नी, मुली आणि कुटुंबीयांनी त्यांचं औक्षण करून आशीर्वाद घेतले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर टिकणारे आरक्षण देणार अशी शपथ घेतली होती आणि तसा शब्दही त्यांनी जरांगे पाटील यांना आरक्षणाबाबत दिला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दिलेला शब्द पाळला असून आता सरकारने फक्त अधिसूचना काढली असून यासाठी विशेष अधिवेशन बोलावून लवकरच याबाबतचा अध्यादेश काढणार असल्याचेही सरकारच्या वतीने जरांगे यांना सांगण्यात आले आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला असून आता फक्त आरक्षणाची अंमलबजावणी बाकी आहे ही अंमलबजावणी झाल्यानंतर कुटुंबप्रमुख म्हणून घरी येईल. सध्या फक्त दोनच दिवस घरी राहीन असं जरांगे यांनी म्हटलंय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *