“जय हनुमान ज्ञान गुन सागर..” श्रीकांत शिंदेनी संसदेत नॉन स्टॉप हनुमान चालीसा म्हंटली
मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास ठराव मांडला. काँग्रेसच्या वतीने या चर्चेला पक्षाचे खासदार गौरव गोगोई यांनी सुरुवात केली.
मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान गप्प का आहेत, असे ते म्हणाले. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील आपल्या लोकसभेतील भाषणामुळे आज चर्चेत आलेले दिसले.
चर्चेसाठी 12 तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. भाजपला चर्चेत सहभागी होण्यासाठी सुमारे सात तासांचा अवधी मिळणार आहे. काँग्रेस पक्षासाठी सुमारे एक तास 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. YSR काँग्रेस पक्ष, शिवसेना, JDU, BJD, BSP, BRS आणि LJP यांना एकूण 2 तासांचा वेळ देण्यात आला आहे. याचे उत्तर पंतप्रधान मोदी 10 ऑगस्टला देऊ शकतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात एकदा हनुमान चालीसा वाचण्यावर बंदी होती. यादरम्यान महिला खासदाराने त्यांना हनुमान चालीसा पाठ आहे का, असा प्रश्न केला. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी सदनात नॉन स्टॉप हनुमान चालीसा म्हणून दाखवली. आम्ही बाळासाहेबांना मानणारे हिंदुत्ववादी आहोत असंही शिंदे यावेळी म्हणाले.
खासदार सौगता रॉय म्हणाल्या की, हे सरकार निर्दयी लोकांचे सरकार आहे. ते पश्चिम बंगालला शिष्टमंडळ पाठवत आहेत, पण एकही शिष्टमंडळ मणिपूरला गेले नाही जिथे आमचे भाऊ-बहिण मरत आहेत. तुम्हाला दया आली नाही आणि त्यामुळेच तुम्ही इतर पक्षांप्रमाणे मणिपूरला गेला नाही.