महत्वाचेमहाराष्ट्र

इंजिनमध्ये बिघाड, डेहराडूनला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लॅंडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित


इंडिगो  विमानाचे दिल्लीत इमर्जंन्सी लॅंडिंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.

इंडिगोचे दिल्ली ते डेहराडूनला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याचे दिल्ली एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. इंडिगोच्या विमानाने बुधवारी (21 जून) दिल्लीहून उत्तराखंडमधील डेहराडूनला उड्डाण केले, परंतु काही वेळाने विमान परतले.

इंडिगोने यासंबंधी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, इंडिगोचे फ्लाइट (दिल्ली ते डेहराडून) तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतले. पायलटने प्रक्रियेनुसार ATC ला माहिती दिली आणि लँडिंगसाठी विनंती केली. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले.

इंडिगोच्या विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या एका विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं.

विमानांमध्ये बिघाडाच्या घटना वाढल्या

अशीच एक घटना 10 जून रोजी घडली होती. दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेबाबत इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, दिल्लीहून चेन्नईला जाणारे फ्लाइट 6E 2789 तांत्रिक समस्येमुळे दिल्लीला परतले. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. प्रवाशांना चेन्नईला नेण्यासाठी पर्यायी विमान उपलब्ध करून देण्यात आले. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमान कंपन्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

गुवाहाटीमध्ये इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

याशिवाय 4 जून रोजी दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदारही त्या विमानात होते. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी बंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे तेलंगणातील शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (RGIA) आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *