महत्वाचेमहाराष्ट्र

भारताची ऑमायक्रोनवर लस तयार, स्वदेशी यंत्रणा वापरुन लस केली विकसित


देशातील जैवतंत्रज्ञान विभागाने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीकडून (DBT) ओमायक्रॉन (Omicron) प्रतिबंधित लस विकसित करण्यात आली आहे.

ही लस संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणांचा वापर करुन तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या एका रोगाने संपूर्ण जगभरात थैमान घातलं त्या कोविडवर 2020 पासूनच अनेक प्रकारच्या प्रतिबंधित लशींचा शोध लावण्यात आला आहे. पंरतु या रोगाचे नवे व्हेरियंट तयार होत होते. जे मूळ व्हायरसपेक्षा अधिक धोकादायक असतं. असाच आलेला एक व्हरेरियंट म्हणजे ओमाक्रॉन. आता या ओमाक्रॉनवर लस विकसित करण्यात भारताला यश आले आहे.

ही लस विकसित करण्यासाठी BIRAC (Biotechnology Industry Research Assistance Council) द्वारे राबवण्यात येणाऱ्या कोविड सुरक्षा उपक्रमाला सहकार्य करण्यात आले आहे. तसेच अगदीच गरजेच्या परिस्थितीत या लशीचा उपयोग करण्याची परवानगी भारतीय औषध नियामक अर्थात (ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया,DCGI) कडून देण्यात आली आहे. या लशीमध्ये कोविडवर काढण्यात आलेला लशीतील मूळ घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या संकल्पनेच्या सुरुवातीपासून ते पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीपर्यंत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या प्रकल्पाला ‘मिशन कोविड सुरक्षा’ अंतर्गत पुढे पाठबळ देण्यात आले होते.

जैवतंत्रज्ञान विभाग म्हणजेच (DBT) हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येत असून ते भारतातील जैवतंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन आणि गती देण्यास मदत करते.यामध्ये कृषी, आरोग्यसेवा, प्राणी, विज्ञान, पर्यावरण आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये हे विभाग काम करते.या विभागने केलेल्या या कामगिरीचे कौतुक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी देखील केले आहे.

नेमका कसा आहे ओमायक्रॉन व्हेरियंट?

कोरोनाच्या (Corona) ओमायक्रॉन व्हेरियंट या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली होती. ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा (Delta) व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले जात होते. ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये विविध लक्षणे (Symtoms) दिसतात, त्याचा परिणाम अनेक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना पाहयला मिळत होता. अनेक संशोधकांनी ओमायक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन देखील केले. ज्यामध्ये असे दिसून आले की ओमायक्रॉनचे एक लक्षण अनेक महिने टिकू शकते आणि त्रासदायकही ठरू शकते. संशोधकांच्या मते, या काळात व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत, परंतु त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होईल, ज्यामुळे तुम्हाला विसरण्याचा देखील त्रास होऊ शकतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *