महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी अवघए काही तास उरले आहेत. पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे वर्षावर पोहचले असून त्यांनीबैठकांचा सपाटा लावला आहे. एवढच नाही तर देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली आहे.
जरी दिवसभर घडणाऱ्या घडामोडी पाहिल्यानंतर शिंदेंची नाराजी शमल्याचे चित्र जरी दिसत असले तरी एकनाथ शिंदेंच्या मागण्यांचे नेमकं काय झालं? त्या पूर्ण होण्याचे दिल्लीतून आश्वासन मिळाले का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात शिवसेना एकनाथ शिंदेंनी चार मोठ्या मागण्या केल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांकेड गृह, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधराम अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. मग आता उपमुख्यमंत्रीपद तुम्ही आम्हाला देत असाल तर ही चार महत्त्वाची खाती आमच्याकडे असायला हवी, असा सूर शिवसेनेच्या नेत्यांकडून आवळताना पाहायला मिळत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या चार मागण्या मान्य होणार का?
भाजप 132 जागा तर शिवसेनेना 57 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता भाजप मोठ्या भावाच्या भूमीकेत आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आज शिंदे पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असून त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. पण मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यातील या चार खात्यांच्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दिल्लीश्वरांच्या मनात नेमकं काय सुरू?
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाजप विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निवडी होण्याची शक्यताआहे. या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून आज मुंबईत येणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना फोन अपेक्षीत आहे. मात्र दिल्लीश्वरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल.