ताज्या बातम्या

भाजपनं गृहमंत्रिपदाचा तिढा सोडवला; शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार ‘ही’ खाती


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे मुख्यनेते आणि विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा तर सोडला. पण, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या असलेले गृहमंत्रिपद मिळावे, म्हणून ते अडून बसले होते.

 

हे पद दिले, तर सत्तेत सहभागी होऊ अथवा सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार एकनाथ शिंदे यांच्या मनात चालल्याची चर्चा होती. मात्र, शिंदेंचं मन वळविण्यात भाजपच्या वरिष्ठांना यश आले असून ते सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे. (BJP solves home minister’s rift; shinde’s Shiv Sena will get these ministries)

 

28 नोव्हेंबरला अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर तीन पर्याय ठेवले.

 

पहिला होता, मुख्यमंत्रिपदाचा. शिंदेंचे म्हणणे होते की, “विधानसभा निवडणुका माझ्या नेतृत्त्वाखाली लढल्यानं महिला, ओबीसी आणि मराठा मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. मीच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन या अपेक्षेने जनतेने मतदान केले. त्यामुळे मला मुख्यमंत्री न केल्यास जनतेत चुकीचा संदेश जाईल.”

 

दुसरा पर्याय होता, मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास काही मंत्रिपदांचा. “देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास गृहमंत्री, अर्थमंत्री आणि महसूलमंत्री ही खाती शिवसेनेला देण्यात यावी. मगच, उपमुख्यमंत्रिदाचा निर्णय घेऊ,” असे शिंदेंनी अमित शहा यांना सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *