ताज्या बातम्या

मोठी बातमी, एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे मांडले 4 प्रस्ताव …


Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकली आहे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहे.

आधी शाह आणि शिंदे यांची बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदेंनी ४ प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर मांडल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यानी अमित शाह यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून अमित शाह यांच्याकडे मांडण्यात आले ४ प्रस्ताव देण्यात आले आहे.

प्रस्ताव 1
मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे ठेवणार असाल तर शिवसेनेकडे आधी असलेली खाती तशीच ठेवा

प्रस्ताव २
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर शिवसेनेला त्यांच्या कोट्यापेक्षा अधिकची ५ महत्त्वाची खाती द्यावी

प्रस्ताव ३
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असतील तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्री द्यावे.

प्रस्ताव ४
शिवसेनेकडून अन्य कुणी उपमुख्यमंत्री होणार असेल तर त्यांना गृहमंत्री आणि अर्थमंत्री भाजपकडून देणार नसाल. तर इतर खाती वाढवून द्यावी. ४ ते ५ खाती वाढवून द्यावी.

दिल्लीत सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दीड तासभर दोन्ही नेत्यांची बैठक झाली. सुनिल तटकरे यांच्या घरी चालली दीड तास बैठक चालली होती. महायुतीच्या बैठकी अगोदर दोन्ही नेत्यांची दिल्लीत बैठक झाली.

तर दुसरीकडे, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे. तासभर ही बैठक पार पडली. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक आटोपून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले.

दिल्लीत पोहोचल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “महायुतीच्या मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही अडथळा नसल्याची मी काल पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे. लाडका भाई दिल्लीत आले आणि लाडका भाई हे पद माझ्यासाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे आहे. बैठकीत सर्व बाबींवर चर्चा होईल”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *