वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली असून मतमोजणी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी लढत आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना तीन राज्यांमध्ये सर्वाधिक मतं मिळाली आहेत.
तर कमला हॅरिस यांना एकाच राज्यात जास्त मतं मिळवता आली. सहाजिकच डोनाल्ड ट्रम्प सध्या आघाडीवर आहेत.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत आहे. दोन्ही नेत्यांना आपली ताकद आणि शक्तिप्रदर्शन केलं होतं. जर कमाला हॅरिस जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील. जर ट्रम्प जिंकले तर दुसऱ्यांदा राष्ट्रध्यक्षपदाची शपथ ते घेतील.
अमेरिकेचा राष्ट्रपती होण्यासाठी बहुमताचा आकडा 270 आहे. आतापर्यंत 9 राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. तर कमला हॅरिस 5 राज्यांमध्ये कमला हॅरिस यांना विजय मिळाला आहे. दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. जॉर्जियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी आहे.
रिपब्लिकन पार्टीचे ट्रम्प यांना आतापर्यंत 6,685,498 मतं मिळाली आहेत. डेमोक्रॅटिक उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात विशेषतः जॉर्जिया या महत्त्वपूर्ण राज्यात चुरशीची लढत असलेल्या अमेरिकेच्या सहा राज्यांमध्ये मंगळवारी मतदान केंद्रे बंद होती. इंडियाना, केंटकी, साउथ कॅरोलिना, व्हरमाँट आणि व्हर्जिनिया येथेही मतदान केंद्रे बंद होती कारण लाखो अमेरिकन लोकांनी आधीच मतदान केले होते. अमेरिकन नेटवर्क्सने इंडियाना आणि केंटकीमध्ये ट्रम्प यांना विजयी घोषित केले, तर स्विंग स्टेट जॉर्जियामध्ये त्यांची आघाडी आहे. वर्माँटमध्ये कमला हॅरिसला विजयी घोषित करण्यात आले आहे.
जॉर्जियासह सहा राज्यांमध्ये पहिले मतदान संध्याकाळी 7 वाजता ( भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30) संपलं. अलास्का इथे मध्यरात्री 12 वाजता ( भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30) वाजता संपेल. भारतीय वेळानुसार सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदान संपेल त्यानंतर लगेच मतमोजणी सुरू होईल. भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. एक्झिट पोलनुसार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. कमाला हॅरिस 44.4 टक्के मतांनी पिछाडीवर आहेत.