ताज्या बातम्या

हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक हल्ला; PM Modi यांच्याकडून तीव्र शब्दांत निषेध


कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात रविवार, ४ नोव्हेंबर या दिवशी हिंदू मंदिरावर खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हिंदू धर्माला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याच्या या प्रकारावर सर्वत्र संताप व्यक्त होत असतांनी संताप व्यक्त होत आहे.

 

पंतप्रधान मोदींनीही याचा निषेध व्यक्त केला आहे. भारतीय उच्चाधिकारी मंदिराला भेट देण्यासाठी आले असताना सदर हल्ला करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “हिंदू मंदिरांवर जाणीवपूर्वक हल्ला केलेला असून राजनैतिक अधिकाऱ्यांना एकप्रकारे धमकाविण्याचा भ्याड प्रयत्न यातून झालेला आहे.” या हल्ल्यानंतर आता कॅनडाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

येथे पहा !

भारत आणि कॅनडा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सप्टेंबर महिन्यात केला होता. हा आरोप करताना त्यांनी याबाबत ठोस असे पुरावे सादर केले नव्हते. भारताने त्यांच्या आरोपाचे जोरदार खंडन केले. या आरोपानंतर भारताने कॅनडातील सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावून घेतले. तसेच कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच कॅनडाबाबत विधान केले आहे.

 

खलिस्तानवाद्यांनी याआधीही भारतीय नागरिक, राजनैतिक अधिकाऱ्यांना लक्ष्य केलेले आहे. खलिस्तान्यांच्या कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधात भारत ठामपणे उभा असल्याचा संदेश यानिमित्ताने दिला गेला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *