ताज्या बातम्याबीड जिल्हामहाराष्ट्रराजकीय

Beed News : पंकजा मुंडेंना धोका दिल्याचा आरोप; कुंडलिक खांडेविरोधात गुन्हा दाखल


Beed News : बीडमध्ये पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) 6 हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव महायुतीतील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुद्ध काम केल्यामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

याशिवाय मराठा आणि वंजारी अशा जातीय संघर्षामुळे पंकजा मुंडे यांना कमी मत मिळाली, अशीची चर्चा रंगली आहे. मात्र यानंतर बीड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे ते कबूल करताना दिसत आहेत, तर बजरंग सोनावणे यांना मदत केली असल्याचेही म्हणत आहेत. याप्रकरणी आता कुंडलिक खांडे यांच्याविरुद्ध परळीत गुन्हा दाखल झाला आहे. (Beed Alleged Audio Case Alleged threat to Pankaja Munde A case has been registered against Kundlik Khande)

कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांच्यावर टीका होताना यला मिळत आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडेंचे ऑफीसही फोडलं आहे. या प्रकरणानंतर कुंडलिक खाडेंचा फोन बंद होता, पण ऑडिओ क्लिपमधून व्हायरल होणारा आवाज त्यांचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होते. मात्र यानंतर आता धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांनी कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेना बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्याविरुद्ध परळी पोलीस स्टेसनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांच्यातील लोकसभा निवडणूक निकालापूर्वी झालेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. ज्याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली देत आहेत. तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषाही करत आहेत.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये?

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर या दोघांमधील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे म्हणताना दिसत आहेत की, मी बजरंग सोनावणे यांचं काम केलं आहे. त्यांनी आता आपला दिलेला शब्द पाळावा. फक्त माझ्या गावातील 100-200 मतं पंकजा मुंडे यांना जास्त गेली आहेत. कारण ते करणं मला गरजेचं होतं. मला जातीवादी शिक्का नको आहे. ओबीसी मतांचा आपल्याला विधानसभेला फायदाच आहे. बाकी 376 बुथवरची यंत्रणा मी बजरंग सोनावणे यांना देऊन टाकली हेही तितकंच खरं आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिला आहे. यावर शिवराज बांगर म्हणतात की, नुसती यंत्रणा नाही, तर बजरंग सोनावणे यांच्यासाठी पैसेही दिले का? यावर कुंडलिक खांडे म्हणतात की, नुसती यंत्रणा नाही तर मी लोकांना पैसे देखील दिले आहेत.

मुंडेंच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या आत्महत्या

दरम्यान, पंकजा मुंडेंचा फक्त 6 हजार मतांनी पराभव झालेला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीज जिल्ह्यात तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय पंकजा मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील पाथर्डी, शिरुर, परळीसह विविध ठिकाणी बंद पुकारत पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *