ज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. दरम्यानन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. मोदी सरकारने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजपासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन लहान असले तरी वेळेच्या दृष्टीने ते ‘खूप मोठे’, ‘मौल्यवान’ आणि ‘ऐतिहासिक निर्णयांनी’ भरलेले आहे. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे ७५ वर्षांचा प्रवास आता एका नव्या ठिकाणाहून सुरू होत आहे.
‘चंद्रयान-3 आणि G20 च्या यशस्वी संघटनेनंतर हे सत्र सुरू होत आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. G20 मध्ये ग्लोबल साउथचा आवाज असल्याचा भारताला नेहमीच अभिमान वाटेल. आफ्रिकन युनियनचे स्थायी सदस्यत्व आणि G20 ची एकमताने घोषणा, या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देतात. मंगळवारी, गणेश चतुर्थीच्या दिवशी नवीन संसदेच्या कामकाजाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, नवीन स्थानापर्यंतचा प्रवास पुढे नेत असताना आपल्याला नवीन दृढनिश्चय, नवीन ऊर्जा आणि नवीन विश्वासाने काम करावे लागेल.
पीएम मोदी म्हणाले, २०४७ पर्यंत देशाचा विकास करायचा आहे. यासाठी जे निर्णय घेतले जाणार आहेत ते सर्व या नवीन संसद भवनात घेतले जातील. नव्या सभागृहात आपण उत्साहाने आणि आत्मविश्वासाने प्रवेश कर. हे अधिवेशन अत्यंत मोलाचे असल्याचेही मोदी म्हणाले.
संसदेत विविध पक्षांनी केलेल्या गदारोळावर मोदी म्हणाले, “रडायला खूप वेळ आहे, करत राहा, पण आयुष्यात काही क्षण असे असतात जे तुम्हाला उत्साहाने भरून टाकतात. विश्वासाने भरून जातात.” अशा प्रकारे मी या सत्राकडे पाहतो, असंही मोदी म्हणाले.