क्राईमताज्या बातम्यानांदेड

नांदेड मधील युवकाची आत्महत्या, मराठा आराक्षणाचा मिळावे म्हणून उचलेले टोकाचे पाऊल


महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आराक्षणाचे आंदोलन सुरु होते. दरम्यान नांदेड  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या युवकाने आत्महत्या  केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलेले आगे. या घटनेमुळे संपुर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातील ही घटना आहे. मराठा समाजाला आराक्षण मिळावे याकरिता आंदोलनात सहभागी झाला होता. पंरतू काही निष्पण झाले नाही, आणि युवकाने टोकाचे पाऊल उचलेले. गावकऱ्यांनी समाजाला आराक्षण मिळावे या हेतूने आत्महत्या केल्याची सांगत आहे.

या घटनेमुळे गावात नव्हे तर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गळफास घेवून आत्महत्या केल्याची सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून घटनेची नोंद केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *