ताज्या बातम्यामहत्वाचे

‘ओबीसी आरक्षणात वाटेकरी येऊ देणार नाही’, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य


”सात आठ दिवसांपासून ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे. आज संभाजीनगर येथील उपोषणस्थळी भेट दिली. सरकारच्या वतीने एक आश्वासन देतो की, ओबीसीच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही.

ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही”, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

नागपूर येथे कुणबी ओबीसी समाजाचं उपोषण सुरु आहे. आज देवेंद्र फडणवीस हे उपोषणस्थळी पोहोचले असता उपस्थित लोकांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.फडणवीस म्हणाले की, ”मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका, पुनर्विचार पिटीशन दाखल करण्यासंदर्भात काम करतो आहे. एक कमिटी तयार केली आहे, ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहे. त्यांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात, शिंदे कमिटी एक महिन्यात आहवाल देईल.”

ओबीसी समाजासाठी स्वाधार योजना लवकरच’

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ”ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात अंतिम काम सुरू आहे. ओबीसी वसतिगृह लवकरच सुरू होतील. स्वाधार योजना लवकरच लागू होईल. ओबीसी समाजाला घरे मिळावे यासाठी 10 लाख घरे तयार करतो आहोत. येत्या आठवड्याभरात मुख्यमंत्री यांच्यासोबत ओबीसी समितीची एक बैठक मुंबईत लावली जाईल, त्यातून ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात चर्चा सोडविण्याचा प्रयत्न.”

ते म्हणाले, ओबीसी समाजबाबत आमचे कमिटमेंट आहे, ”’त्यामुळं सरकार ओबीसी सोबत आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, कुठे चुकलो तर आम्हाला सांगावे. सरकार आपल्या पद्धतीने चालते. कंत्राटी संदर्भात अफवा पासरविल्या जात आहेत. मात्र जाहिराती काढून 75 लाख नाही तर दीड लाख नोकऱ्या आम्ही देऊ.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *