ताज्या बातम्यामहत्वाचेमुंबई

छगन भुजबळ प्रकरणात चक्क कोर्टच झाले चकित. बघा, ईडीने काय कबूल केलं.


मुंबई  – प्रशासकीय यंत्रणा कधीकधी फारच विनोदी कारभार करत असते आणि त्याची सर्वसामान्य माणसाला सवय झाली आहे. पण आता ईडी सारखी तपास यंत्रणाही यात सामील झाली आहे.

आपण एखाद्यावर कारवाई का करतोय, त्याच्या विरोधात याचिका का दाखल करतोय, याची माहितीच नसल्याचे खुद्द ईडीने न्यायालयात कबुल केले.

विशेष म्हणजे सक्तवसुली संचालनालय (ईडी) जेव्हा याचिकाकर्ता म्हणून स्वतःचाच विषय विसरून बसतो, तेव्हा न्यायालयाने तरी काय करावे? हा प्रकार घडला महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी. या प्रकरणात मंत्री छगन भूजबळ आणि त्यांच्या पुतण्या समीर भूजबळ यांच्या विरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. पण ही याचिका आपण नेमकी कशासाठी दाखल केली आहे, याचाच ईडीला विसर पडला. हे ऐकून न्यायालयाच्या भूवयाच उंचावल्या. न्यायमूर्तींनी ईडीचा दावा ऐकून आश्चर्य व्यक्त केले आणि असे कसे होऊ शकते, असा सवालही केला.

महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात ईडीने २०१८ मध्ये याचिका केली होती. या याचिकेवर, आतापर्यंत एकदाही सुनावणी झालेली नाही. न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर बुधवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्या वेळी भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात दाखल केलेल्या स्वत:च्याच याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. ईडीच्या दाव्यावर आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली. तसेच, याचिकेवरील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

न्यायालयाने सुनावले
हे प्रकरण आहे तरी काय? याचिका नेमकी कशासाठी करण्यात आली आहे? अशी विचारणा न्यायमूर्ती लढ्ढा यांनी ईडीच्या वकिलांकडे केली. त्या वेळी याचिकेशी संबंधित कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे आणि त्यामुळे याचिकेबाबत आपल्याला काहीच सांगता येत नसल्याचेही वकिलाने सांगितले. तेव्हा, आम्हाला फक्त हे प्रकरण काय आहे, हे सांगा, असे न्यायालयाने सुनावले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *