आशिया कपमधील सुपर-4 सामन्यांना आता सुरुवात झाली आहे. येत्या 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायप्रोफाईल सामना खेळवला जाणार आहे.
त्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू मैदानात कसून तयारी करताना दिसतायेत. अशातच आता टीम इंडियाने एका खेळाडूला थेट मायदेशी पाठवलंय. गेल्या काही दिवसांपासून केएल राहूल अनफीट असल्याने संघाबाहेर होता. अशातच आता केएल राहुलने संघात पुनरागमन केल्याने टीम इंडियाने संजू सॅमसनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
सध्या सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल खेळला नव्हता. त्याच्याजागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. आता मात्र, राहुल फीट असल्याने राहुल संघात कमबॅक करणार हे पक्कं झालंय. त्यामुळे आता श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार का? असा सवाल विचारला जातोय. संजू सॅमसनला यष्टीरक्षक-फलंदाजासाठी राखीव खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं होतं. इशान किशन हा संघातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज होता. मात्र, पाकिस्तानविरुद्ध इशानची बॅट तळपली अन् टीम इंडियातील स्थान त्याने पक्कं केलंय. त्यामुळे आता त्यामुळे आता केएल राहुलचं काय होणार? संघात कोणत्या दोन खेळाडूंना स्थान मिळणार? इशान किशन, केएल राहुल की श्रेयस अय्यर? असा सवाल विचारला जात आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.