ताज्या बातम्या

बोगी पूर्णपणे जळून खाक,रेल्वे बोगीला आग लागून 10 जणांचा मृत्यू


मदुराई ः तामिळनाडू राज्यातील रेल्वेच्या खासगी बोगीमध्ये अवैधपणे गॅस सिलिंडर घेवून जाणे चांगलेच जीवावर बेतले असून, यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मदुराई रेल्वे स्थानकाजवळ रामेश्‍वरमला जाणार्‍या रेल्वेच्या खासगी बोगीत आग लागली होती.

या रेल्वे बोगीत 20 हून अधिक लोक होरपळले आहेत. मृत्यू झालेले 10 ही जण उत्तरप्रदेशातील आहेत.
सीतापूरच्या एका ट्रॅव्हल एजन्सीने या खासगी डब्याचे थर्ड पार्टी बुकिंग केले होते. त्यात 63 जण प्रवास करत होते. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 5.15 च्या सुमारास ही आग लागली. जेव्हा ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनवर थांबली होती. यानंतर अग्निशमन दलाने 5.45 वाजता आग विझवण्याचे काम सुरू केले. सकाळी 7.15 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. केवळ खासगी डब्यांना आग लागली आहे. आग दुसर्‍या डब्यापर्यंत पसरण्यापासून रोखण्यात आली. डब्याला आग लागण्याचे मुख्य कारण म्हणजे बेकायदेशीरपणे वाहून नेले जाणारे सिलिंडर. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आयआरसीटीसीद्वारे कोणीही कोच बुक करू शकतो, परंतु सिलिंडर घेऊन जाण्यास बंदी आहे. असे असतानाही एक प्रवासी सिलिंडर घेऊन चढला. डीआरएमसह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी आहेत. जखमींना मदुराईच्या शासकीय राजाजी महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताशी संबंधित दोन व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये एक महिला आणि अनेक प्रवासी वाचवा वाचवा ओरडत आहेत. थोड्या वेळाने हा आवाज शांत होतो. रेल्वे कर्मचारी अग्निशमन यंत्र आणि पाण्याचा वर्षाव करत आहेत. मात्र, त्याचा आगीवर परिणाम होत नव्हता.आगीच्या ज्वाळा वाढत असल्याचे पाहून रेल्वेने तत्काळ शेजारील बोगी वेगळ्या केल्या, जेणेकरून आग इतर बोगींमध्ये पसरू नये. आगीत एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. रेल्वेने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *