राज्यातील भाजपप्रणीत शिंदे-पवार सरकार हे गंमतजंमतचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहेत. सरकारमध्ये साकळागोंधळ सुरू आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मिंधे सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना पटोले म्हणाले, या सरकारमध्ये एक मंत्री 6 जिह्यांचा पालकमंत्री आहे, 36 जिल्ह्यांना 19 पालकमंत्री नियुक्त केले असून 17 जिल्ह्यांना अजून पालकमंत्रीच नाहीत. 15 ऑगस्टला ध्कजारोहण कोण करणार याकरून सरकार संभ्रमात आहे. यामुळे ध्वजारोहण कोण करणार याची यादी दोन वेळा बदलायला लागल्याचा टोला पटोले यांनी लगावला.
तीन पक्षांच्या या सरकारला जनतेच्या समस्यांचे काहीही पडलेले नाही. जनता बेहाल असताना त्यांच्यासाठी काही करण्याऐकजी सरकारी तिजोरी कोण जास्त लुटतो याची तीन पक्षांत स्पर्धा सुरू असल्याचे पटोले म्हणाले.