शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद विवाद आजवर आपण पाहतच आलो आहोत. मात्र आता यावेळी आपल्याला या दोघांच्या मुलांमध्ये चुरस पाहिला मिळणार आहे.
कारण की, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आमने-सामने येणार आहेत. हे दोघे भाऊ विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सिनेट निवडणुकीत या दोघांमध्ये नक्की कोण बाजी मारेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेत जोराची टक्कर होईल. आजवर आपण या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे ताकद पाहत आलो आहोत. मात्र आता, ठाकरे गट बाजूला पडल्यामुळे सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाला जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. येत्या दहा सप्टेंबरपासून विद्यापीठात ही सिनेट निवडणूक सुरू होणार आहे.
यंदाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाला हरवण्यासाठी शिंदे गटाने आणि भाजप गटाने चांगला जोर लावल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये आता अजित पवारांच्या गटाने देखील उडी मारल्यामुळे ठाकरे गटासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, या निवडणुकीत दोन्ही भाऊच आमने सामने आल्यामुळे कोण कोणाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाचल्यामुळे मैदानात उतरलेल्या पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राजकीय वर्तुळात जर छाप पाडायची असेल तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही सर्वात जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. सिनेट निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट अशी आहे. या सर्व अर्जांची छाननी 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत करण्यात येईल. तर अर्ज मागे घेण्याची मुदत 25 ऑगस्ट पर्यंत असेल. 28 ऑगस्ट रोजी सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर 10 सप्टेंबर रोजी सिनेट निवडणुकीसाठी मतदान करण्यात येईल.