वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, रूपाली चाकणकर हे उपस्थित आहेत.
दरम्यान, वाहतूक कोंडी होत असल्यामुळे चांदणी चौकात नवा उड्डाणपूल बांधण्याची योजना पुढे आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते पण हे काम भूसंपादनामुळे रखडले होते. त्यानंतर प्रत्यक्ष २०१९ मध्ये कामाला सुरूवात झाली. येथील काम आणखी सोयीस्कर होण्यासाठी मागच्या वर्षी चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला होता. भूमिपुजनानंतर तब्बल ६ वर्षांनी हे काम पुर्णत्वास जात असून त्याचे आज उद्घाटन झाले आहे.
Ajit Pawar : चांदणी चौकाच्या उद्घाटनाला अजित पवार निघाले मेट्रोने; गर्दीतून उभ्यानेच केला प्रवास
पूर्वीचा चांदणी चौक…
मुंबईहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधन, मुळशी व एनडीएहून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती
परिसरातील रहिवाशांना घरी किंवा बाहेर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत असे
परिणामी मुख्य मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे
आठ रॅम्पने बदलला चांदणी चौकाचा चेहरा-मोहरा
रॅम्प-१ (मुळशी रस्त्यावरून सातारा/कोथरूडकडे जाण्यासाठी)
रॅम्प-२ (मुळशी रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)
रॅम्प-३ (मुळशी रस्त्यावरून बावधन/पाषाणकडे जाण्यासाठी)
रॅम्प-४ (कोथरूड/सातारा रस्त्यावरून मुळशीकडे जाण्यासाठी)
रॅम्प-५ (एनडीए/बावधन रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)
रॅम्प-६ (पाषाण/बावधन रस्त्यावरून सातारा/कात्रजकडे जाण्यासाठी)
रॅम्प-७ (सातारा/कोथरूड रस्त्यावरून पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)
रॅम्प-८ (सातारा/कोल्हापूर रस्त्यावरून मुळशी/पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)
कामाचा कालावधी : फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३
मोठा पूल : लांबी १५० मीटर, रुंदी ३२ मीटर
मुख्य रस्त्यावर : नऊ मोठे गर्डर
सेवा व अन्य रस्त्यांसाठी : ३३ छोटे गर्डर
वाहतुकीसाठी सुरक्षा : ३३ वार्डनची नेमणूक
फायदा काय?
परिसरातील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागणार नाही
मुख्य रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल
मुख्य रस्त्यावर परिसरातील वाहनांची संख्या कमी होईल
मुळशी, कोथरूड, बावधन आदी भागांतून येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज नाही
दिवसाला दीड लाख वाहने सहजपणे धावू शकतील अशी रस्त्याची रचना
पुढील ५० वर्षांचा विचार करून मार्गाचे काम केल्यामुळे वाहनांची संख्या वाढली तरी कोंडी होणार नाही.
हा बदल महत्त्वाचा
१ मुंबई-सातारा मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा.
२ सातारा-मुंबई मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा.
३ मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने दोन सेवारस्ते.