नवी दिल्ली : रेल्वेनं रोज लाखो लोक प्रवास करतात. दैनंदिन जीवनात प्रवासासाठी भारतातील लोकांचा कल रेल्वेकडे असतो. त्यामुळे भारतातील रेल्वेची जगभर चर्चा आहे. रेल्वे नेटवर्कविषयी बोललो तर भारताचा क्रमांक चौथा लागतो.
तुम्हाला जगातील सर्वात लांब मोठं रेल्वे स्टेशन माहितीय का? यात भारताचा पहिला नंबर आहे. जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन भारतात आहे. हे स्टेशन नेमकं कुठे आहे आणि यामध्ये काय खास गोष्टी आहेत याविषयी जाणून घेऊया.हावडा जंक्शन हे देशातील सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे.
हे पश्चिम बंगालच्या राजधानीत आहे. याला देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन देखील म्हटलं जातं. या रेल्वेवर 10-15 नव्हे तर 23 प्लॅटफॉर्म आहेत. येथे 26 रेल्वे लाईन आहेत.
ज्यातून दररोज सुमारे 600 गाड्या जातात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1854 मध्ये या जंक्शनवरून देशाची दुसरी ट्रेन सुरू झाली.सापांचं विष कसं काढलं जातं? Video पाहून येईल अंगावर काटादेशातील सर्वात जुने रेल्वे स्थानक होण्याचा मान हावडा जंक्शनला आहे. या रेल्वे स्थानकाची इमारत 1854 साली बांधण्यात आली.
हे स्टेशन हुगळी नदीवरील पुलाद्वारे कोलकाता मुख्य शहराला जोडते. येथून देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागात जाण्यासाठी रेल्वे आहेत. या जंक्शनमध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त गाड्या ठेवण्याची क्षमता आहे. समोरून मेट्रो आली, तरीही तरुणीचं नव्हतं लक्ष; ट्रॅकवर गेली आणि घडलं धक्कादायककोलकात्यात हावडा बरोबरच सियालदह नावाचे आणखी एक मोठे रेल्वे स्टेशन आहे.
हे देशातील दुसरं मोठं रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनला 20 प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मला सर्वात व्यस्त प्लॅटफॉर्म असेही म्हणतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या प्लॅटफॉर्मवरून दररोज हजारो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन पकडतात.दरम्यान, ट्रेनने प्रवास करणारी लोक खूप जास्त आहेत. ट्रेनने प्रवास करणं जेवढं सोपं तेवढंच धोक्याचंही आहे. रेल्वेनं प्रवास करताना अनेक अपघातही घडतात.