ताज्या बातम्या

हे तर होणारच होतं…; चाहत्यांची गर्दी फळली, पहिल्याच दिवशी Jailor नं कमवले ‘इतके’ कोटी


रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. यावेळी फक्त आणि फक्त रजनीकांत यांचीच चर्चा रंगलेली आहे. हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये अक्षरक्ष: त्यांच्या फॅन्सनी त्यांच्याप्रती असलेल्या प्रेमाचे दर्शन देण्यास सुरूवात केली आहे.

कुणी त्यांच्या फोटोची पूजा करतेय तर कोणी त्यांच्या फोटोच्या कटआऊटला चक्क दुधाचा अभिषेक करताना दिसतं आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांचीच. आपल्या हटके अभिनयानं ते सर्वांनाच घायाळ करून सोडतात. 10 ऑगस्ट रोजी रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. येत्या दोनच दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. त्यातून या चित्रपटाची कोणी कार्यालयं बंद ठेवली आहेत. दुकानं बंद ठेवली आहेत तर परदेशातून चक्क अनेक चाहतेही भारतात खास ‘जेलर’ पाहायला येत आहेत. तेव्हा चला तर मग पाहुया की यावेळी नक्की या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कोटी कमावले आहेत.

कोटीसॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, गुरूवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘जेलर’नं 43.5 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी त्यांची ओपनिंगचं हीट झाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 50 कोटींच्या आसपास गल्ला भरला आहे. यानुसार, तामिळनाडूत या चित्रपटानं 35.5 कोटी कमावले आहेत. सोबतच तेलंगणा 7.55 कोटी तर कर्नाटक थेथे 2 कोटी कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी दक्षिणेत यावर्षीचा सर्वाधिक ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला आहे. चित्रपट वितरक आणि तामिळनाडूच्या थिएटर ओनर्स असोसिएशनचे प्रमुख तिरूपूर सुब्रमण्यम यांनी पीटीआयला माहिती देताना सांगितले की, तामिळनाडू राज्यात 900 स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखवला जात आहे. या चित्रपटाच्या रिलिजनंतर प्रेक्षक आनंद साजरा करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक

‘जेलर’ या रजनीकांत यांच्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. रजनीकांत यांचे चित्रपट हे हीट होणारच यात काहीच वाद नाही. त्यातून या चित्रपटानं आपला एक वेगळा गरीमा तयार केला आहे. त्यातून या चित्रपटातून एका कॉमन मॅनची स्टोरी ते त्यांचा अन्यायाविरूद्धचा लढा पाहायला मिळतो आहे. त्यातून या चित्रपटाला ट्विटवरवरूनही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची तूफान चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.

हेही वाचा – ‘गेली 25 वर्षे एकत्र, तरीही प्रत्येक क्षण…’, ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश नारकर यांच्याबद्दल केला खुलासा

यावेळी या चित्रपटातून ‘टायगर’ मुथुवेल पांडियन यांच्या भुमिकेतून रजनीकांत प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे नेल्सन यांनी केले आहे. जे साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *