पंचगंगेच्या काठी वसलेला कोल्हापुर जिल्हा!
साडेतिन शक्तीपीठांपैकी संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या अंबाबाईचा कोल्हापुर जिल्हा!ज्या मातीत घडुन गेलेल्या इतिहासाच्या पाउलखुणा आजही पहायला मिळतात तो कोल्हापुर जिल्हा!शाहु महाराजांचा कोल्हापुर जिल्हा! छत्रपती शाहु महाराजांच्या काळात (1874- 1922) या जिल्हयाचा मोठया प्रमाणात कायापालट झाला.
कोल्हापुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
Kolhapur Jilha Mahiti
पंचगंगेच्या काठी वसलेला कोल्हापुर जिल्हा!
साडेतिन शक्तीपीठांपैकी संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या अंबाबाईचा कोल्हापुर जिल्हा!
ज्या मातीत घडुन गेलेल्या इतिहासाच्या पाउलखुणा आजही पहायला मिळतात तो कोल्हापुर जिल्हा!
कोल्हापुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Kolhapur District Information in Marathi
शाहु महाराजांचा कोल्हापुर जिल्हा! छत्रपती शाहु महाराजांच्या काळात (1874- 1922) या जिल्हयाचा मोठया प्रमाणात कायापालट झाला.
कोल्हापुर त्याच्या रांगडेपणामुळे, खवय्येगिरीने, कुस्तीमुळे, पेहेरावावरून, परंपरांमुळे, ऐतिहासिक वास्तुंमुळे प्रसिध्द आहे.
आपुलकीच्या भाषेमुळे, प्रेमळ माणसांमुळे सुध्दा कोल्हापुर ओळखले जाते.
एका आख्यायिकेनुसार कोल्हासुर नावाच्या राक्षसामुळे येथील लोक फार त्रस्त झाले होते, त्याच्या अराजकतेला कंटाळुन देवतांनी देवीला विनंती केली त्यामुळे देवी महालक्ष्मीने त्या कोल्हासुरा सोबत युध्द केले.
हे युध्द नऊ दिवस चालले त्यानंतर अश्विन शुध्द पंचमीला देवी महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला त्यावेळी त्याने देवीला विनंती केली की या नगरीचे नाव कोल्हापुर आणि करवीर अशी आहेत ती यानंतरही न बदलता अशीच राहु दयावी.
पन्हाळगडाला वेढा देउन सिध्दी जोहरने याच ठिकाणी शिवाजीराजांना कोंडीत पकडले शिवा काशीद आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलिदानाला या शहराने पाहिले आहे मोगलांच्या तावडीतुन सुटल्यानंतर संभाजी राजे आणि शिवाजी महाराजांची भेट येथेच झाली.
प्रकृती, इतिहास, संस्कृति आणि आध्यात्माची योग्य सांगड असलेला हा जिल्हा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्ति ला काही ना काही तरी देतोच!
कोल्हापुर जिल्हयातील तालुके – Kolhapur District Taluka List
या जिल्हयात एकुण 12 तालुके आहेत
- करवीर
- आजरा
- कागल
- गगनबावडा
- गडहिंग्लज
- चंदगड
- पन्हाळा
- भुदरगड
- राधानगरी
- शाहुवाडी
- शिरोळ
- हातकणंगले
कोल्हापुर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Kolhapur Zilla Chi Mahiti
- लोकसंख्या 38,76,001
- क्षेत्रफळ 7685 वर्ग कि.मी.
- साक्षरतेचे प्रमाण 51%
- एकुण गावं 1235
- एकुण तालुके 12
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 953
- मुख्य मातृभाषा मराठी
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 आणि क्र. 48 या जिल्हयातुन जातो.
- छत्रपती शाहु महाराजांपुर्वी छत्रपती ताराबाईंनी या शहराच्या विकास कार्यात मोलाची भर घातली
- पौराणिक मान्यतेनुसार भगवानी विष्णुंनी कोल्हापुर ला स्वतःचे निवासस्थान मानले होते.
- या नगरीला ’दक्षिण काशी’ देखील म्हणतात.
- देवी भागवत पुराणात देखील कोल्हापुर नगरीचा उल्लेख आलेला आहे.
- छत्रपती शाहु महाराजांच्या कार्यकाळात या भागात मोठया प्रमाणात सामाजिक आणि शैक्षणिक विकास झाला.
- भारतात सर्वात आधी बनवण्यात आलेला चल चित्रपट ’ राजा हरिश्चंद्र’ या ठिकाणी तयार झाला होता.
- कोल्हापुरी साज हा दागिन्यांमधला प्रकार या ठिकाणचा असुन गावाच्या नावाने तो आजही ओळखला जातो.
- कोल्हापुरी चप्पल फार प्रसिध्द असुन ही चप्पल मशिन ने नाही तर हाताने बनवण्यात येते. येथील चप्पल एवढी प्रसिध्द आहे की पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर कोल्हापुरी चप्पल घेतल्याशिवाय माघारी फिरतच नाही. परदेशातुनही या चपलांना मोठया प्रमाणात मागणी असते.
- खाण्याच्या शौकिनांकरता तांबडा पांढरा रस्सा म्हणजे जीव की प्राण! कोल्हापुरची ही एक खासियत असुन या पदार्थाची चव या ठिकाणची खासियत आहे. येथील मिसळ देखील फार लोकप्रीय आहे.
- कोल्हापुरी मसाला ही देखील येथील खासियत
- धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळं कोल्हापुर ला विपुल प्रमाणात असल्याने 12 ही महिने येथे भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी असते.
- कोल्हापुरच्या अंबाबाई व्यतिरीक्त या ठिकाणचे ज्योतिबा दैवत देखील फार प्राचीन आणि प्रसिध्द ठिकाण आहे.
- कोल्हापुरी फेटा हे देखील इथले वैशिष्टयं, याला बांधण्याची देखील एक अनोखी शैली आहे.
- उसाच्या विक्रमी उत्पादनाकरता हा जिल्हा ओळखला जातो.
- अंबादेवी मंदिर, रंकाळा तलाव, पन्हाळगढ, शाहु महाराजांचा राजवाडा आणि वस्तुसंग्रहालय, नृसिंहवाडी, गगनबावडा, खिद्रापुर, विशाळगड, राधानगरी, दाजीपुर अभयारण्य, ही धार्मिक आणि पर्यटन स्थळं या जिल्हयाच्या वैभवात भर घालतात.
- कोल्हापुर हे महाराष्ट्रातील मोठे शहर असल्याने या ठिकाणी रेल्वे, बस आणि विमानसेवा उपलब्ध आहे.
कोल्हापुर चे पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit in Kolhapur
-
करविर निवासीनी कोल्हापुरची महालक्ष्मी – Mahalaxmi Temple Kolhapur
पुराणात सांगितलेल्या आख्यायिकेनुसार देवाधिदेव महादेव देवीसतीचा देह आपल्या खांद्यावरून वाहुन नेत असतांना देवीची वस्त्र, तीची आभुषणं, आणि तिच्या देहाचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झाले, भारत भरात अशी 51 शक्तीपीठं असुन महाराष्ट्रात त्यातली साडे तिन शक्तीपीठं आहेत.
करविर निवासीनी कोल्हापुरची अंबाबाई अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत! अंबाबाईची ही मुर्ती रत्नशिलेची असुन साधारण 3 फुटाची ही मुर्ती 40 किलो वजनाची आहे. ही मुर्ती चर्तुभुज असुन चार वेगवेगळया गोष्टी देवीने आपल्या हाती धारण केल्या आहेत. एका हाती ढाल, दुस.या हाती गदा, तिस.या हातात भाळुंगाचं फळ आणि चैथ्या हातात पानपत्र.
हिंदु धर्मग्रंथांमधे या देवीचा आणि या मंदिराचा अनेकवेळा उल्लेख आढळतो.
कोल्हापुरच्या अंबाबाई चे मंदिर अतिशय वैशिष्टयपुर्ण आहे इसविसन 109 मधे राजा कर्णदेव ज्यावेळी कोकणातुन कोल्हापुरात आले त्यावेळी त्यांनी आजुबाजुचे जंगल तोडुन हे मंदिर शोधुन काढले हेमाडपंथी असलेले हे मंदिर काळया पाषाणातील असुन रेखीव आणि अप्रतीम आहे.
भर उन्हात देखील मंदिरात गारवा जाणवतो तो या काळया पाषाणामुळे! फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी किरणोत्सव पाहाण्याकरता हजारो भाविक गर्दी करतात, एका विशिष्ट झरोख्यातुन सुर्याची किरणं देविच्या मुखापासुन पायापर्यत येतात.
पहाटे साडेचार पासुन देविच्या नित्य पुजेला सुरूवात होते आणि रात्री शेजारती ने समारोप होतो. नवरात्राच्या नऊ दिवसांमधे तर प्रत्येक दिवशी देवीची वेगळी आरास आणि पुजा मांडली जाते जी अतिशय देखणी आणि नयनरम्य अशी असते.
कोल्हापुरला आल्यानंतर देविचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक माघारी फिरत नाहीत एवढे महात्म्य या देवीचे आहे. रेल्वे, बस आणि विमानसेवा असल्याने या ठिकाणी येणे सोयीचे आहे.
-
न्यु पॅलेस शाहु महाराजांचा राजवाडा आणि वस्तुसंग्रहालय – New Palace Kolhapur
पुर्वी हे ठिकाण शाहु महाराजांच्या राजघराण्याचे निवासस्थान म्हणुन ओळखले जायचे 1884 साली तयार झालेल्या या राजवाडयाला न्यु पॅलेस म्हंटले जाते.
या ठिकाणी आपल्याला हिंदु आणि ब्रिटीश बांधकामाची रचना आढळते. आज या संग्रहालयात पर्यटकांना त्याकाळचे वस्त्र, शस्त्र, खेळ, आभुषणं अश्या वस्तुंचा संग्रह पहायला मिळतो
शिवाय इंग्रजांच्या काळातील पत्रव्यवहार देखील पहायला मिळतो. या राजवाडयात शाहु महाराजांचे वेगळे संग्रहालय देखील बघायला मिळते.
पॅलेस च्या सभोवताली कुस्तीचे मैदान, देखणी बाग, रंगबिरंगी कारंजे देखील पहाण्यासारखे आहे.
याशिवाय शाहु महाराजांशी संबंधीत भवानी मंडप देखील जरूर पहावा असाच. याला ’ग्लोरी ऑफ द सिटी’ म्हणुन ओळखले जाते. हा भवानी मंडप शिवाजी महाराजांनी बांधलाय आणि देवी भवानीला समर्पीत केलाय या मंडपा मधला हॉल आणि भव्य दालन मनाला मोहिनी घालतं
-
ज्योतिबाचे मंदिर – Jyotiba Temple Kolhapur
ज्योतिबा या ठिकाणाला रत्नगिरी म्हणुन देखील ओळखल्या जातं.
या ठिकाणी रत्नासुर या राक्षसाचा ब्रम्हा विष्णु आणि महेश या तिघांनी मिळुन वध केल्याचे सांगितल्या जाते, या पवित्र स्थानाला बारा ज्योर्तिलिंगा एवढेच महत्व देण्यात आले आहे, ज्योर्तिलिंगापैकी केदारनाथ या ठिकाणाला मानले जाते.
कोल्हापुरातील उत्तरेकडच्या पर्वतांमधे वसलेले हे सुंदर मंदिर, याची निर्मीती 1730 मधे करण्यात आलीये, मंदिर फार प्राचीन असुन मंदिरात ज्योतिबाची स्थापण्यात आलेली मुर्ती चारभुजा असलेली आहे.
भैरवाचा पुर्नजन्म म्हणुन देखील ज्योतिबाला मानले जाते त्यांनी रत्नासुराशी युध्दात देवी महालक्ष्मीला मदत केल्याचे देखील भाविक सांगतात.
रत्नासुराच्या नावामुळेच या ठिकाणचे नाव रत्नगिरी असे पडले पुढे ग्रामस्थांनी हे नाव ’ज्योतिबा’असे केले. चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो त्यावेळी गुलालाची उधळण केली जाते, दुरवर सर्व पर्वत गुलाबी रंगात न्हाउन निघतात. दर महिन्याच्या पौर्णिमेला देखील या तिर्थक्षेत्री मोठी गर्दी होते.
ज्योतिबाचा डोंगर कोल्हापुर पासुन जवळपास 21 कि.मी. दुर असुन पाउण तासाचा अवधी लागतो.
-
पन्हाळगड – Panhalgad Kolhapur
पन्हाळगडावरची पावन खिंडीतील लढाई आजही अंगावर रोमांच उभे करते तो पन्हाळगड याच कोल्हापुर जिल्हयात वायव्येस 12 मैलावर आहे.
पन्हाळयाला जवळपास 1200 वर्षांचा इतिहास आहे, हा किल्ला मराठयांची काही काळ राजधानी होता, इतिहासाच्या दृष्टीने आणि येथे येणा.या पर्यटकांच्या दृष्टीने देखील हा किल्ला महत्वाचा आहे
शिवा काशिद आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या प्राणांची आहुती या किल्ल्याने पाहिली आहे स्वराज्याकरता त्यांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले.
पुढे कोंडाजी फर्जंदर यांच्या मदतीने 1673 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. त्यानंतर पन्हाळा कोल्हापुरची राजधानी झाली.
2 जानेवारी 1954 ला भारत सरकारने या पन्हाळगड किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षीत स्मारक म्हणुन घोषीत केले आहे.
पन्हाळा किल्ला कोल्हापुर पासुन उत्तर पश्चिमेकडे 20 कि.मी. अंतरावर आहे.
-
रंकाळा तलाव – Rankala Lake
कोल्हापुरचा ’मरिन ड्राईव्ह’ अशी ओळख असलेला रंकाळा तलाव कोल्हापुर वासियांचे संध्याकाळच्या वेळेस फिरण्याचे सर्वात आवडते ठिकाण आहे.
पाण्याने तुडंुब भरलेला हा तलाव येथील सृष्टी सौंदर्यामधे अधिकच भर घालतो, या पाण्यावर विविध प्रकारचे पक्षी खेळतांना, बागडतांना पाहाणे सुखदायक भासते.
रंकभैरव या महालक्ष्मीच्या रक्षकाचे मंदिर या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी रंकाळा हे नाव पडले.
शाहु महाराजांनी त्यांच्या काळात या ठिकाणी बरेच बदल केलेत आणि आता तर या ठिकाणी चैपाटीच तयार झाली आहे त्यामुळे लहानांपासुन मोठयांपर्यंत सगळेच या ठिकाणी फिरण्याकरता येतात.
वेगवेगळया प्रकारचे पक्षी, वनस्पती आणि सुर्यास्त बघण्याकरता पर्यटक या रंकाळा तलावावर गर्दी करतांना दिसुन येतात.
-
नरसोबा वाडी – Narasoba Wadi
श्री दत्तगुरूंचे अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्व लाभलेले हे स्थान कोल्हापुरातील अत्यंत धार्मीक ठिकाण आहे. आपल्या नृसिंह सरस्वती अवतारात दत्तगुरूंचे 12 वर्ष या ठिकाणी वास्तव्य होते. पंचगंगेच्या तिरावर त्यांचे मंदिर असुन त्यांच्या पादुकांची या ठिकाणी पुजा केली जाते. दत्त भक्तांची या ठिकाणी मोठया प्रमाणावर गर्दी होत असुन दत्त जयंती च्या सुमारास तर संपुर्ण गाव भक्तीमय वातावरणात रमुन जातं.
कोल्हापुर पासुन नरसोबा वाडीचे अंतर 48 कि.मी. असुन साधारण 1 ते दिड तासाचे हे अंतर आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसने येथे येण्याची सोय असुन खाजगी वाहनाने देखील येथे येता येईल.
-
कणेरी मठ सिध्दगिरी ग्रामजिवन म्युझीयम – Kaneri Math
कोल्हापुर ला आलात आणि कणेरी मठ पाहिला नाही तर तुम्ही एका अत्यंत चांगल्या पर्यटन स्थळाला मुकलात अस समजायचं!
ग्रामिण समाजजिवनाशी आपली भेट घडवुन देणारे हे सिध्दगिरी ग्रामजिवन म्युझीयम पाहायला तुमच्याजवळ संपुर्ण दिवस जरी असला तरी तो कमी पडतो की काय असे वाटुन जाते कारण ज्या पध्दतीने जीवंत देखावे या ठिकाणी साकारले आहेत ते पाहातांना आपला वेळ कसा निघुन जातो ते कळतही नाही.
प्राचीन काळी होउन गेलेले ऋषी मुनींचे जिवंत देखावे या ठिकाणी आहेतच शिवाय जुन्या काळात प्रत्येक जातीनिहाय कुटुंब त्यांच्या व्यवसायासह या ठिकाणी साकारण्यात आले आहेत, या मुर्ती इतक्या जिवंत आहेत की कितीतरी वेळ आपण चकीत होउन त्या जिवंत देखाव्यांकडे पाहातच राहातो. विहीरीवर पाणी भरणा.या स्त्रिया, विटीदांडु खेळणारी मुले, झाडाखाली निवांत बसलेली बाया माणसं, गारूडयाचा खेळ दाखविणारा गारूडी, कुस्ती खेळणारे पहेलवान, बाजारपेठा, गावातील मंदीरात भरणारी शाळा हे सर्व पाहुन एखाद्या गावात आलोय की काय असा भास होतो.
देवीने त्याची विनंती मान्य केली आणि आजही हे शहर कोल्हापुर आणि करविर या नावाने ओळखले जाते.
हे शहर इतिहासात घडुन गेलेल्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे.