जळगाव हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे . या जळगाव जिल्ह्याला पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, तर पूर्वेस बुलढाणा जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याच्या आग्नेयेस जालना जिल्हा आहे , तसेच दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याच्या नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. या जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाचे उत्पादन करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे . भारतातील सर्वात जास्त केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे .
या जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस कि.मी. आहे . जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहे. ज्वालामुखी मुळे तयार झालेले मृदा ही कापूस उत्पादनासाठी अतिशय महत्त्वाची आहे . अशी मृदा जळगाव जिल्ह्याला लाभली आहे त्यामुळे याठिकाणी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. जळगाव जिल्हा हा सोने,चहा, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे . जळगाव मध्ये जास्त करून अहिराणी भाषा बोलली जाते. जळगाव जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो.
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गिरणा , तापी, पूर्णा,, वाघूर,बोरी,अंजनी,पांझरा
बहिणाबाई चौधरी या प्रसिद्ध बालकवी व कवयित्री ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या . जळगाव ही साने गुरुजींची कर्मभूमी होती.
जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा समावेश होतो.
एरंडोल,अमळनेर,, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, मुक्ताईनगर , जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भुसावळ,भडगाव, यावल व रावेर
जळगाव जिल्हा विशेष
जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ
जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खालील प्रमाणे आहेत .
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाची स्थळे
मनुदेवी मंदिर
उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे
श्री राम मंदिर (जुने जळगाव)
ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
श्री राम मंदिर (जुने जळगाव)
चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम
संत चांगदेव मंदिर
अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर
श्री पद्मालय, एरंडोल (अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ)
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी
थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ पाटणादेवी येथे आहे .
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला पारोळा येथील भुईकोट किल्ला
पाल (रावेर तालुका)- थंड हवेचे ठिकाण
फारकंडे झुलता मनोरा
अमळनेर येथील भुईकोट किल्ला
यावल येथील भुईकोट किल्ला
वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर
संत मुक्ताबाई मंदिर (मुक्ताईनगर)
संत सखाराम महाराज मंदिर (अमळनेर)
मंगळग्रह मंदिर (अमळनेर)
गांधीतीर्थ (जळगांव शहर)
साई बाबा मंदिर (पाळधी)
मेहरुण तलाव
वाघूर डॅंम
कांताई बंधारा (जळगाव)
आर्यन पार्क (जळगाव)
गांधी उद्यान (जळगांव शहर)
गणपती मंदिर (तरसोद)
पाल- थंड हवेचे ठिकाण
गोशाळा (कुसूंबा)
श्री कृष्णा मंदिर (वाघळी)
अप्पा महाराज समाधी मंदिर (जळगाव शहर)
स्वामी भक्तानंदजी महाराज समाधी स्थळ (निमगव्हाण,चोपडा)